चित्रपट निर्माता राम गोपाल वर्मांविरुद्ध एफआयआर दाखल, ट्विटवरुन कारवाई

चित्रपट निर्माता राम गोपाल वर्मांविरुद्ध एफआयआर दाखल
ram gopal varma
ram gopal varma

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता रामगोपाल वर्मा यांच्याविरुद्ध उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) हजरतगंज कोटवाली पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आला आहे. नुकतेच त्यांनी एक वादग्रस्त ट्विट केले होते. त्यावरुन एफआयआर नोंदवले गेले आहे. वर्मा यांनी द्रौपदी, पांडव आणि कौरव याबाबत वादग्रस्त ट्विट केले होते. (An FIR Register Against Film Producer Ram Gopal Varma In Uttar Pradesh)

ram gopal varma
गांधीजींनी बोस यांची हत्या केली; भाजप खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) आपल्या २५ जून रोजी केलेल्या ट्विटमध्ये म्हणतात, अत्यंत आदरणीय द्रौपदी या राष्ट्रपती असणार आहेत. दोघेही पांडव आणि कौरव आपापली लढाई विसरून जातील. तसेच ते एकत्र येऊन त्यांची (द्रौपदीची) पूजा करतील आणि मग महाभारत नव्या भारतात पुन्हा लिहिल जाईल आणि संपूर्ण जगाला भारताचा अभिमान वाटेल. जय भाजप, असा खोचक टोला वर्मा यांनी द्रौपदी मुर्मू यांच्या राष्ट्रपती उमेदवारी अर्जावरुन भाजपला लगावला आहे.

ram gopal varma
'खूश राहायचं असेल तर लग्नच करू नका'; घटस्फोटाबाबत राम गोपाल वर्मा यांचा सल्ला

या ट्विटवरुनच प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्मात्यावर एफआयआर नोंदविण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com