Jugad Jeep: गड्याने अशी जीप बनवली की आनंद महिंद्रा चकित झाले. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anand Mahindra

Jugad Jeep: गड्याने अशी जीप बनवली की आनंद महिंद्रा चकित झाले

तामिळनाडूतील एका व्यक्तीने जुगाडमधून एवढी अप्रतिम स्वदेशी इलेक्ट्रिक जीप बनवली की प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा सुद्धा स्तुती करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत.

आनंद महिंद्रा यांनी त्या व्यक्तीचे केवळ कौतुकच केले नाही तर आपल्या अधिकाऱ्यांना त्याच्याशी संपर्क साधण्यास सांगितले.

देसी इलेक्ट्रिक जीप बनवणाऱ्या ए. गौतम याने आपल्या कामाचा व्हिडिओ शेअर करत गौतमने आनंद महिंद्रा यांना टॅग केले आणि त्यांच्याकडे नोकरीची मागणी केली.

गौतमच्या १७ ऑगस्टला केलेल्या ट्विटकडे आनंद महिंद्रा यांचे लक्ष लागताच त्यांनी लगेचच त्याला उत्तर दिले. ट्विटला उत्तर देताना आनंद महिंद्रा यांनी लिहिले की, 'यामुळेच मला विश्वास आहे की भारत इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात अग्रेसर होईल. मला विश्वास आहे की अमेरिकेसारख्या देशांनी कार आणि तंत्रज्ञानाबद्दल लोकांची आवड आणि गॅरेज 'टिंकरिंग'च्या बळावर त्यांच्या नाविन्यामुळे ऑटो क्षेत्रात वर्चस्व मिळवले आहे. गौतम आणि त्याची 'वृत्ती' ही खूप पुढे जाऊ शकते. @Velu_Mahindra कृपया त्याच्याशी संपर्क साधा.'

आनंद महिंद्रा यांच्या या प्रतिक्रियेनंतर गौतमचे नशीब बदलू शकते

Web Title: Anand Mahindra Got Suprised By This Desi Jugad Jeep

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Tamil NaduAnand Mahindra