Anand Mahindra : अ‍ॅलेक्साच्या मदतीने माकडापासून केला बचाव, चिमुरडीच्या हुशारीवर खुश झाले आनंद महिंद्रा! थेट दिली जॉब ऑफर

Anand Mahindra : महिंद्रा या उद्योगसमूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. नुकतेच ते एका पोस्टमुळे चर्चेत आले आहेत.
Anand Mahindra
Anand Mahindraesakal

Anand Mahindra : महिंद्रा या उद्योगसमूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. X  या सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्मवर ते सतत विविध प्रकारच्या पोस्ट शेअर करताना दिसतात. लोकांशी कनेक्ट होण्यासाठी ते प्रेरणादायी गोष्टी ही शेअर करताना दिसतात. कधीतरी मजेशीर पोस्टमुळे ही ते चर्चेत येतात. त्यामुळे, सोशल मीडियावर त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे.

आता पुन्हा एकदा आनंद महिंद्रा चर्चेत आले आहेत. ते चर्चेत येण्यामागचे कारण म्हणजे आनंद महिंद्रा यांनी शनिवारी ‘अ‍ॅलेक्सा’ च्या मदतीने स्वत:ला आणि लहान बहीणीला माकडाच्या हल्ल्यातून वाचवणाऱ्या मुलीला जॉब ऑफर केला आहे. या संदर्भात त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ही माहिती शेअर केली आहे.

उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात राहणाऱ्या १३ वर्षांच्या निकिता पांडेय या मुलीने शनिवारी अ‍ॅलेक्सा या डिव्हाईसच्या मदतीने एका माकडाला घरातून पळवून लावले. हे माकड तिच्या घरात घुसले होते.

त्यानंतर, माकडाने या मुलीवर आणि तिच्या १५ महिन्यांच्या लहान बहीणीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु, अ‍ॅलेक्साच्या मदतीने निकिताने बुद्धीचा वापर करून, या माकडाला हुसकावून तर लावलेच शिवाय आपल्या लहान बहीणीचा जीव ही वाचवला.

निकिताची लहान बहीण घरातील ज्या रूममध्ये होती. त्या रूममध्ये माकड शिरल्यावर निकिताने त्या माकडाला हुसकावण्यासाठी अ‍ॅलेक्सा या डिव्हाईसला कुत्र्याप्रमाणे भुंकण्याची सूचना दिली.

तिची ही सूचना अ‍ॅलेक्साने स्विकारली आणि कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज काढला. निकिताची ही युक्ती कामी आली आणि माकडाने घरातून पळ काढला. त्यामुळे, निकिताचा ही जीव वाचला आणि तिच्या लहान बहीणीचा ही जीव वाचवण्यात तिला यश आले. निकिताच्या या कामगिरीचे कौतुक होत असून, खुद्द आनंद महिंद्रांनी तिच्या या कामगिरीवर खुश होऊन तिला जॉब ऑफर केला आहे.

आनंद महिंद्रांनी निकिताला ऑफर केला जॉब

आनंद महिंद्रा यांनी एक्स या सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत म्हटलय की, “ आपण टेक्नॉलॉजीचे गुलाम होणार की स्वामी होणार? हा सध्याच्या काळातील प्रमुख प्रश्न आहे. या तरूण मुलीची गोष्ट आपल्याला हा दिलासा देतेय की, टेक्नॉलॉजी नेहमीच ह्युमन टॅलेंटला प्रोत्साहन देणारी असणार.

तिची विचारसरणी ही विलक्षण होती. या मुलीने पूर्णपणे अप्रत्यक्ष जगात तिची नेतृत्व क्षमता दाखवली आहे. तिचे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जर तिने कधी कॉर्पोरेट जगतात काम करण्याचा निर्णय घेतला तर, मला आशा आहे की, महिंद्रा राईजमध्ये आम्ही तिला आमच्यात सहभागी होण्यास तयार करू शकू..!”

Anand Mahindra
12th Fail movie Anand Mahindra: "राष्ट्रीय पुरस्कार मिळणारच!" '12th फेल' वर आनंद महिद्रांनी केला कौतुकाचा वर्षाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com