

Historic Dashavatara Temple at Deogarh to Receive Modern Facilities for Visitors
esakal
बुंदेलखंडमधील पर्यटनाला चालना देण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने ललितपूर जिल्ह्यातील देवगड येथील ऐतिहासिक दशावतार मंदिराच्या विकासासाठी २.८० कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांतर्गत पर्यटकांसाठी आधुनिक सुविधा उभारण्यात येणार असून, त्यासाठी १.७५ कोटी रुपयांचा पहिला हप्ता मंजूर करण्यात आला आहे.