...आणि मोदींनी तिला पाठवले उपरणे!

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

महाशिवरात्रीनिमित्त एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धारण केलेले उपरणे ट्‌विटरद्वारे एका महिलेने मागितले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्या महिलेचे घरी ते उपरणे आल्याने तिला आनंद आणि आश्‍चर्याचा सुखद धक्का बसला.

नवी दिल्ली - महाशिवरात्रीनिमित्त एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धारण केलेले उपरणे ट्‌विटरद्वारे एका महिलेने मागितले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्या महिलेच्या घरी मोदींचे उपरणे आल्याने तिला आनंद आणि आश्‍चर्याचा सुखद धक्का बसला आहे.

कोइम्बतूर येथे इशा फाऊंडेशनने महाशिवरात्रीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला मोदी यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी मोदींच्या हस्ते शंकराच्या 112 फूट मूर्तीचे अनावरण करण्यात आले. यावेळी मोदी यांनी निळा-हिरवा रंग असलेले एक उपरणे धारण केले होते. त्यावर शंकराचे चित्रही होते.

या कार्यक्रमानंतर काही वेळातच नवी दिल्लीतील शिल्पी तेवरी नावाच्या महिलेने ट्‌विट करत थेट मोदींकडे या उपरण्याची मागणी केली. दुसऱ्याच दिवशी मोदींच्या स्वाक्षरीसह उपरण्याची मागणी केलेले ट्‌विट आणि उपरणे शिल्पीच्या घरी पोहोचले. हे पाहून शिल्पीला आनंद आश्‍चर्याचा सुखद धक्का बसला. उपरणे मिळाल्यानंतर शिल्पीने या सर्वांची माहिती देणारे आणि मोदी यांचे आभार मानणारे ट्विटस केले आहेत.

Web Title: ...and modi sends her Shiva Stole