...सासरच्यांनी तिचे लग्न लावले सलमानसोबत!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 September 2019

मुलाच्या मृत्यूनंतर त्याची नोकरी सुनेला मिळू नये, यासाठी सासरच्यांनी सुनेच्या दुसऱ्या लग्नाचा फोटो न्यायालयात सादर केला. मात्र, या फोटोत सासरच्यांनी आपल्या सुनेचे लग्न चक्क अभिनेता सलमान खान झाले असल्याचे दाखवले आहे.

नवी दिल्ली : मुलाच्या मृत्यूनंतर त्याची नोकरी सुनेला मिळू नये, यासाठी सासरच्यांनी सुनेच्या दुसऱ्या लग्नाचा फोटो न्यायालयात सादर केला. मात्र, या फोटोत सासरच्यांनी आपल्या सुनेचे लग्न चक्क अभिनेता सलमान खान झाले असल्याचे दाखवले आहे. त्यामुळे हा फोटो पाहून उपस्थित वकील आणि न्यायाधीश देखील अचंबित झाले आहे.

छत्तीसगडमधील बैकुंठपुर जिल्ह्यातील पंडोपारा कालरी गावातील बसंतलाल याचा विवाह सूरजपुर येथील रानी देवी हिच्याशी झाला होता. बसंत हा एसईसीएलमध्ये कार्यरत होता. मात्र, त्याच्या मृत्यूनंतर सासरच्यांनी त्याच्या पत्नी रानी देवीला बसंतसोबत काही संबंध नसल्याचे सांगत घरातून काढून दिले होते. बसंतची नोकरी आणि सर्व अधिकार त्याची पत्नी रानीला देण्यास त्याच्या क़ंटूंबियांचा विरोध होता. याच विरोधातून न्यायालयात खटला सुरु होता. या खटल्यादरम्यानच्या सुनावणीवेळी हा प्रकार समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रानीच्या वकिलांना बैकुठंपुर येथील कौटूंबिक न्यायालयाने रिकॉर्ड पाठवले, ज्यात त्यांच्या सुनेचा विवाह हा सलमान खानसोबत झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. तर न्यायालयासमोर सादर करण्यात आलेला फोटो हा एडिट करण्यात आला आहे. असे रानीच्या वकिलांनी न्यायालयात म्हटले आहे. दरम्यान, रानीला बसंतलाल याच्या मृत्यूनंतर एसईसीएलमध्ये नोकरी मिळू नये, म्हणून सासरच्यांकडून हा बनाव करण्यात आला असल्याचे न्यायालयात स्पष्ट झाले आहे.

छत्तीसगड मधील बैकुठंपुर येथील न्यायालयाने या फोटोला बनावट ठरवले असून, मुलाच्या मृत्यूनंतर त्याचा पत्नीस सर्व अधिकार देण्यास सांगितले आहे. बैकुठंपुर येथील न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आता सासरच्यांनी उच्च न्यायालयात अपील केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ...and they present photo in court, about daughter in law married with Salman!