आंध्रप्रदेशच्या संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jagan mohan reddy

जगनमोहन रेड्डींचा मोठा निर्णय; आंध्रच्या संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा

आंध्रप्रदेशच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा दिला असून सध्याचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी हे पुन्हा नव्याने मंत्रीमंडळ स्थापन करणार असल्याची माहीती आहे.

मुख्यमंत्री YS जगन मोहन रेड्डी यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मंत्रिमंडळात बदल करण्याचा निर्णय घेतला होता. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पहिल्या टप्प्यात 24 मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. मंत्रिमंडळात सध्या जगन रेड्डी हे एकमेव मुख्यमंत्री राहिले आहेत. त्याअगोदर मुख्यमंत्र्यांनी आपला अर्धा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर मंत्रिमंडळात बदल करणार असल्याचं सांगितलं होतं. हा बदल २०२१ च्या डिसेंबर महिन्यात होणार होता परंतु कोरोनाच्या संकटामुळे हा बदल पुढे ढकलण्यात आला असल्याचं सांगितलं जातंय.

दरम्यान मुख्यमंत्री जगननमोहन रेड्डी यांनी बुधवारी संध्याकाळी राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन यांची भेट घेतली होती त्यावेळी त्यांनी मंत्रिमंडळातील बदलांची माहिती त्यांना दिली.

Web Title: Andhrapradesh Total Ministry Resignation Jaganmohan Reddy

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top