esakal | चिडलेल्या नागाने सुरू केला दुचाकीस्वाराचा पाठलाग...
sakal

बोलून बातमी शोधा

angry cobra captures bike after after tale  injured at uttar pradesh

एक युवक दुचाकीवरून मित्रांसह प्रवास करत होता. रस्त्यावरून जाणाऱया नागाच्या शेवटीवरून दुचाकीचे चाक गेल्यामुळे नाग चिडला. नागाने दुचाकीचा पाठलाग सुरू केला व दुचाकीवर जाऊन बसल्याची घटना येथे घडली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे.

चिडलेल्या नागाने सुरू केला दुचाकीस्वाराचा पाठलाग...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

जालॉन (उत्तर प्रदेश) : एक युवक दुचाकीवरून मित्रांसह प्रवास करत होता. रस्त्यावरून जाणाऱया नागाच्या शेवटीवरून दुचाकीचे चाक गेल्यामुळे नाग चिडला. नागाने दुचाकीचा पाठलाग सुरू केला व दुचाकीवर जाऊन बसल्याची घटना येथे घडली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे.

उत्तर प्रदेशातील जालॉन चाकी गावामध्ये ही घटना घडली आहे. गावात राहणारे गुड्डू पचोरी हे एका साथीदारासह दुचाकीवरून प्रवास करत होते. प्रवासादरम्यान दुचाकीचे चाक नागाच्या शेपटीवरून गेले. शेपटीवरून चाक गेल्यामुळे नाग चिडला. नागाने बदला घेण्यासाठी दुचाकीचा पाठलाग सुरू केला. नागाच्या पाठलागामुळे त्यांनी दुचाकी सोडून पळ काढला. पण, नाग दुचाकीवर जाऊन बसला. तासभर फणा काढून तसाच बसला होता. नागाला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. नागाच्या दिशेने दगड फेकल्यानंतर तो दुचाकीवरून खाली उतरून निघून गेला.

गुडडूने सांगितले की, दुचाकीवरून जात असताना चुकून चाक नागाच्या शेपटावरून गेले. शेपटावरून चाक गेल्याचे लक्षात आल्यानंतर मागे वळून पाहिले तर नाग आमच्या दिशेने येत होता. आम्ही पुढे जात होतो. पण, तो आमच्याच दिशेने येत होता. आमचा पाठलाग केल्याचे लक्षात आल्यानंतर घाबरून गावाजवळ आल्यानंतर दुचाकी सोडून पळ काढला. पण, नाग दुचाकीवर जाऊन बसला. यावेळी जमलेल्या नागरिकांनी मोबाईलमध्ये शुटींग केले. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

loading image
go to top