Anil Kumble : आता माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे दिसणार नव्या भूमिकेत; कर्नाटक सरकार देणार 'ही' मोठी जबाबदारी!
Former Cricketer Anil Kumble : कर्नाटक वन्यजीव मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून यापूर्वी काम केलेले अनिल कुंबळे हे जगभरात प्रसिद्ध आहेत. ते वनसंवर्धन, वन पुनरुज्जीवन, वृक्षसंवर्धन आणि वन्यजीव संवर्धन याबद्दल जनतेमध्ये जागरुकता निर्माण करतील.
बंगळूर : माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे (Former Cricketer Anil Kumble) यांना वन आणि वन्यजीव राजदूत (अॅम्बेसिडर) म्हणून नियुक्त केले जाईल, असे वन, जीवशास्त्र आणि पर्यावरणमंत्री ईश्वर बी. खांड्रे (Ishwar b. Khandre) यांनी सांगितले.