'नेताजी आणि गांधी हिरो होते,जे भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढले' | Anita Bose Pfaff | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anita Bose
'नेताजी आणि गांधी हिरो होते,जे भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढले'

'नेताजी आणि गांधी हिरो होते,जे भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढले'

नवी दिल्ली : नेताजी सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी यांच्यात जिव्हाळ्याचे संबंध नव्हते. गांधींना वाटायचे की ते नेताजींवर नियंत्रण ठेवू शकत नव्हते. दुसरीकडे माझे वडील गांधींचे मोठे प्रशंसक होते, असे अनिता बोस फॅफ (Anita Bose Pfaff) म्हणाल्या. अनिता बोस या सुभाषचंद्र बोस (Subhash Chandra Bose) यांच्या कन्या आहेत. अभिनेत्री कंगना राणावतने महात्मा गांधी (Mahatma Gandhi) आणि जवाहरलाल नेहरु ब्रिटिशांना हवाली करण्यास तयार होते. असे वादग्रस्त विधान केले आहे. इंडिया टुडे टीव्हीशी बुधवारी (ता.१७) बोलताना अनिता बोस यांनी कंगना राणावतच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे. अनिता बोस म्हणतात, की दोघे (नेताजी आणि गांधी) हिरो होते, जे भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढले. एकमेकांशिवाय ते शक्य नव्हते.

हेही वाचा: 'कंगना जे बोलली ते द गार्डियनमध्ये लिहिले गेले'

फक्त अहिंसेने भारताला स्वातंत्र्य मिळाल्याचा काही काँग्रेस सदस्य बऱ्याच काळापासून दावा करत होते, त्या प्रमाणे हे नाही. आम्हाला सर्वांना माहीत होते की नेताजी आणि आयएनए (भारतीय राष्ट्रीय सैन्य) यांच्या कृतीचेही योगदान भारताच्या स्वातंत्र्यात आहे. फक्त नेताजी आणि आयएनए यांच्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळाल्याचा दावा अर्थहीन आहे. गांधींनी अनेकांना प्रेरित केले. त्यात नेताजीही असल्याचे त्या म्हणाल्या. लाखो लोकांना भारताच्या स्वातंत्र्याला योगदान दिले असल्याचे बोस यांनी सांगितले. मंगळवारी (ता.१६) कंगना राणावतने इन्स्टाग्रामवर लिहिले आहे, की सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंग यांना महात्मा गांधी यांनी पाठिंबा दिला नाही. गांधींच्या अहिंसा तत्त्वाची कंगनाने थट्टा केली होती. स्वातंत्र्याबाबत फक्त एकाच बाजूने चर्चा करणे भाबडेपणा ठरेल, असे अनिता बोस यांनी सांगितले.

loading image
go to top