

ankita bhandari muder case
esakal
उत्तराखंडमधील बहुचर्चित अंकिता भंडारी हत्याप्रकरणाच्या तपासाचा आणि न्यायालयीन प्रक्रियेचा घटनाक्रम अतिरिक्त पोलीस महासंचालक (गुन्हे व कायदा-सुव्यवस्था) डॉ. व्ही. मुरुगेशन यांनी पत्रकार परिषदेत मांडला. २०२२ मध्ये ऋषिकेशजवळील वनंतरा रिसॉर्टमध्ये कार्यरत असलेल्या १९ वर्षीय अंकिता भंडारीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींना २४ तासांच्या आत अटक केली होती. त्यानंतर विशेष तपास पथकाने (SIT) ८८ दिवसांत तपास पूर्ण करून सुमारे ५०० पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले, अशी माहिती मुरुगेशन यांनी दिली.