ankita bhandari Killed case actress and mla narco test
sakal
अंकिता भंडारी हत्याकांडातील कथित व्हीआयपीच्या भूमिकेवरून चर्चेत आलेल्या व्हायरल ऑडिओ आणि व्हिडिओ प्रकरणात महत्त्वाची न्यायालयीन घडामोड घडली आहे. माजी आमदार सुरेश राठोड आणि अभिनेत्री उर्मिला सनावर यांनी नार्को टेस्ट तसेच पॉलीग्राफ अर्थात लाई डिटेक्टर चाचणीसाठी संमती दिली आहे. दोघांनी विशेष न्यायदंडाधिकारी (सीबीआय) न्यायालयात हजर राहून आपली भूमिका स्पष्ट केली. न्यायालयाने त्यांना २६ ऑक्टोबर रोजी पुन्हा हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.