

CM Pushkar Singh Dhami Orders CBI Probe
Sakal
उत्तराखंड : उत्तराखंडमधील बहुचर्चित अंकिता भंडारी हत्या प्रकरणाला आता एक नवे आणि महत्त्वाचे वळण मिळाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशी करण्याची शिफारस केली आहे. अंकिताचे कुटुंबीय, विरोधी पक्ष आणि संतप्त नागरिक गेल्या अनेक दिवसांपासून ही मागणी करत होते. या मागणीसाठी ११ जानेवारी रोजी 'उत्तराखंड बंद'ची हाक देण्यात आली होती, मात्र सीबीआय चौकशीच्या घोषणेनंतर आता हे आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आले आहे.