CAA Protest
CAA Protestsakal

CAA Protest : केरळमध्ये ‘सीएए’विरोधी निदर्शने ; भाजपकडून केरळच्या मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

केरळमधील सत्ताधारी डाव्या पक्षाने वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) अंमलबजावणीच्या विरोधात आपला विरोध तीव्र करीत असताना, भारतीय जनता पक्षाने रविवारी (ता. २४) मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्यावर हल्लाबोल करीत मुख्यमंत्री हे एका हेतूने अशा प्रकारचे वक्तव्य करीत असल्याचा आरोप केला.

तिरुअनंतपुरम : केरळमधील सत्ताधारी डाव्या पक्षाने वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) अंमलबजावणीच्या विरोधात आपला विरोध तीव्र करीत असताना, भारतीय जनता पक्षाने रविवारी (ता. २४) मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्यावर हल्लाबोल करीत मुख्यमंत्री हे एका हेतूने अशा प्रकारचे वक्तव्य करीत असल्याचा आरोप केला.

भाजपचे राज्यप्रमुख के. सुरेंद्रन म्हणाले, की सीएएविरोधी निदर्शकांवर दाखल केलेले खटले मागे घेण्याचा निर्णय एका विशिष्ट समुदायाला संतुष्ट करण्यासाठी घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री केसेस मागे घेऊन आदर्श आचारसंहितेचे (एमसीसी) उल्लंघन करीत आहेत. याविरुद्ध आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

श्री. सुरेंद्रन म्हणाले, की ‘सीएए’च्या नावाखाली मुख्यमंत्री खोट्या कथा पसरवत आहेत आणि जातीय ध्रुवीकरणाचा प्रयत्न करीत आहेत. मुख्यमंत्री दाव्यानुसार सीएए कायद्यातून मुस्लिमांना लक्ष्य केले जात आहे. या आरोपाचा आधार काय आहे? सीएए कोणत्याही एका विशिष्ट समुदायाला नागरिकत्व नाकारत नसल्याचा दावा त्यांनी केला. सीएए ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी भारतात आलेल्या पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून मुस्लिम वगळता सर्व धर्मांच्या अनधिकृत स्थलांतरितांना नागरिकत्व देते. त्यांनी आरोप केला की डाव्या सरकारने पूर्वीच्या विरोधी प्रकरणांशी संबंधित खटले मागे घेण्याची घोषणा केली.

CAA Protest
Loksabha Election 2024 : मतदारसंघनिहाय एक उमेदवार देणार ; मनोज जरांगे,३० मार्चला नावांची घोषणा

कासारगोड येथे भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी)ने आयोजित केलेल्या ‘सीएए’विरोधी रॅलीला संबोधित करताना विजयन यांनी भाजपवर हल्ला चढविला आणि सांगितले, की घटनेत अंतर्भूत असलेल्या समानतेच्या कल्पनेला छेद दिला जात असल्याचे सांगितले. डाव्या पक्षातर्फे राज्यात पाच ठिकाणी ‘सीएए’विरोधी मोर्चे काढले जात आहेत. पहिली रॅली शुक्रवारी (ता. २२) कोझिकोडमध्ये झाली. दुसरी कासारगोड येथे पार पडली. कन्नूर, मलप्पुरम आणि कोल्लम येथे आणखी तीन रॅली काढण्यात येणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com