DRDO चं औषध कोरोनाविरोधात कसं करते काम? तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे

DRDO चं औषध कोरोनाविरोधात कसं करते काम? तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे

लशींचा तुटवडा आणि ऑक्सिजनच्या टंचाईमुळे आरोग्य यंत्रणा हतबल झाली असताना डीआरडीओने (संरक्षण संशोधन आणि विकास संस्था) ने विकसित केलेल्या कोरोनाप्रतिबंधक औषधाच्या आपत्कालीन वापराला मंजुरी मिळाली आहे. ‘२-डीजी’ या नावाचे हे औषध भुकटी स्वरूपात असून पाण्यात मिसळून त्याचे सेवन करता येईल. औषध नियंत्रक महासंचालकांनी त्याला मंजुरी दिली आहे. हे औषध घेण्याची पद्धत सोपी असली तरीसुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ते मिळू शकेल. हे औषध लहान पाकिटांमध्ये (सॅशे) सहजपणे मिळू शकेल. या औषधाच्या वैद्यकीय चाचण्यांदरम्यान त्याचे सेवन करणाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आढळून आली. त्यामुळेच त्याच्या वापराला परवानगी देण्यात आली आहे.

‘डीआरडीओ’च्या न्यूक्लिअर मेडिसिन अँड अलाइड सायन्सेस (आयएनएमएएस) या प्रयोगशाळेने हैदराबादच्या डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजच्या सहकार्याने २- डीजी (२-डीऑक्सी-डी-ग्लूकोज रेणू असलेले) हे औषध तयार केले आहे. या औषधाच्या चाचण्यांतून सकारात्मक निष्कर्ष संशोधकांच्या हाती लागले आहेत. यामुळे रुग्णाचे ऑक्सिजनवरील अवलंबित्व कमी होणार आहे.

DRDO चं औषध कोरोनाविरोधात कसं करते काम? तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे
मुलींसाठी DRDO ने केली Scholarship ची घोषणा; कोण आणि कसे करु शकते अर्ज

विविध टप्प्यांत चाचण्या -

डीसीजीआयने नोव्हेंबर- २०२० मध्ये या औषधाच्या तिसऱ्या टप्प्यातील रुग्णालयांतील चाचण्यांना परवानगी दिल्यानंतर डिसेंबर ते मार्च २०२१ या कालावधीत महाराष्ट्रासह दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात, राजस्थान, आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांमधील २७ कोरोना रुग्णालयांमध्ये असलेल्या २२० रुग्णांवर तिसऱ्या टप्प्यातील चाचणी घेण्यात आली. यानुसार रुग्णांचे ऑक्सिजनवरील अवलंबित्व ४२ टक्क्यांवरून ३१ टक्के असे कमी झाल्याचे आढळले. ६५ वर्षांवरील रुग्णांमध्येही असेच सकारात्मक परिणाम आढळून आल्याने हे औषध कोरोनाग्रस्त गंभीर रुग्णांनाही देता येऊ शकते. कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या पेशींमध्ये पोचून विषाणूच्या वाढीला प्रतिबंध करणाऱ्या या औषधाचे उत्पादन आणि वितरण शक्य असल्याचे डीआरडीओचे म्हणणे आहे.

DRDO चं औषध कोरोनाविरोधात कसं करते काम? तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे
कोरोना लस अन् तुमच्या मनातील14 प्रश्नांची उत्तरे

औषध कसे घ्यायचे?

- औषध पावडर स्वरूपात आहे.

- पाण्यात मिसळून घ्यायचे

कधी झाल्या चाचण्या

- डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ या दरम्यान

- देशातील २७ कोविड रुग्णालयांत

या राज्यात झाल्या चाचण्या

- दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक आणि तमिळनाडू

औषध काम कसे करते?

कोणत्याही विषाणूला वृद्धीसाठी ग्लुकोजची गरज असते. ग्लुकोज मिळाले नाही, तर तो निष्क्रीय होण्याची शक्यता असते. २डीआरसी औषधाद्वारे ग्लुकोज सारखी रचना तयार केली जाते. ग्लुकोज समजून जेव्हा विषाणू औषधापर्यंत पोहोचेल, तेव्हा त्याचा प्रसार रोखला जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com