त्या IAS जोडप्याला दूर पाठवलं, कारण..; केंद्रीय क्रीडा मंत्र्यांचं स्पष्टीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 anurag thakur says  mha transferred them-to-send message over ias dog walking

त्या IAS जोडप्याला दूर पाठवलं, कारण..; केंद्रीय क्रीडा मंत्र्यांचं स्पष्टीकरण

पुणे : दिल्लीतील त्यागराज स्टेडियमवर IAS जोडप्याने खेळाडूंना बाहेर हकलून कुत्र्यांच्या फिरवण्याप्रकरणी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (anurag thakur) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात बोलताना त्यांनी या अधिकारी जोडप्याला दूर पाठवण्यामागचं कारण देखील सांगीतलं. खेळाडू देशासाठी पदके घेऊन येतात, त्यांच्याशी कोणतीही छेडछाड केलीली मान्य केली जाणार नाही, असा इशारा यावेळी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिला आहे.

ठाकूर यांनी आज पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात पोहोचले होते. या क्रीडा संकुलाला कुस्तीपटू खशाबा जाधव यांचे नाव देण्यात आले आहे. कार्यक्रमाला उपस्थित असताना ठाकूर यांनी त्यागराज स्टेडियमचा मुद्दा उपस्थित केला. दिल्ली सरकारने काहीही केले नाही. केंद्राने हस्तक्षेप करून त्यांची दूरच्या ठिकाणी बदली केली. हे खेळाडू देशासाठी पदके जिंकतात. यात कोणीही हस्तक्षेप करू नये. माझा ना पक्षाने, ना इतर कोणत्याही पक्षाने नाही, असे केंद्रीय मंत्री म्हणाले.

ठाकुर यांनी पुण्यातील सावित्रीभाई फुले पुणे विद्यापीठातील खाशाबा जाधव क्रीडा संकुलाचे उद्घाटन त्यांनी केले. दिल्लीतील प्रकरणावर बोलताना ते म्हणाले की, खेळाडू बाहेर आहेत पण आयएएस अधिकारी त्यांच्या कुत्र्याला फिरवत आहेत यापेक्षा दुर्दैवी आणि लाजिरवाणे काय असू शकते? असे केंद्रीय मंत्री त्यांचे नाव न घेता म्हणाले. केंद्रीय मंत्र्याने दिल्लीच्या घटनेचा संदर्भ देत म्हणाले की, क्रीडा मैदाने निष्क्रिय राहू नयेत; एकामागून एक स्पर्धा सतत व्हायला हवी. पायाभूत सुविधा आहेत, मैदाने आहेत, परंतु काही निर्बंध आहेत.

हेही वाचा: पुणे : महात्मा फुले वाड्यावर थेट नगरसेविकेच्या सासूचे नाव

दिल्ली सरकारने खेळाडूंना स्टेडियमच्या बाहेर काढणाऱ्या आयएएस अधिकाऱ्यांवर कारवाई केली नाही. खेळाडूंसाठी स्टेडियम खुले करण्यात आले नाही. परंतु केंद्राने कारवाई केली आणि त्यांच्या बदल्या दूरच्या ठिकाणी केल्या, जेणेकरून क्रीडा मैदाने खेळाडूंसाठी आहेत, असा स्पष्ट संदेश सर्वत्र जावा, असे अनुराग ठाकूर म्हणाले.

मी पुन्हा सांगत आहे की ही मैदाने खेळाडूंसाठी आहेत. जर तुमच्या शिक्षक सदस्यांना या 27 एकरच्या मैदानावर खेळायचे असेल तर तुम्ही खेळू शकतात, परंतु कृपया तुमच्या चालण्यासाठीच्या चप्पल घालून सिंथेटिक ट्रॅकवर जाऊ नका, असे मंत्री पुढे म्हणाले. काही नियम असावेत, असे देखील त्यांनी सांगितले.

हेही वाचा: कुत्र्याचे चोचले पुरवणं भोवलं; 'त्या' IAS अधिकाऱ्याची तात्काळ बदली

Web Title: Anurag Thakur Says Mha Transferred Them To Send Message Over Ias Dog Walking

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Anurag Thakur
go to top