arvind kejriwal
arvind kejriwal

APP-Congress : तर मध्ये प्रदेश-राजस्थानमध्ये निवडणूक लढवणार नाहीत…; 'आप'ची काँग्रेसला खुली ऑफर

Published on

दिल्ली आणि पंजाब येथे सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाने काँग्रेसला एक मोठी ऑफर दिली आहे, 'आप'ने जर काँग्रेस पक्ष दिल्ली आणि पंजाबमध्ये निवडणूक लढवली नाही तर आम आदमी पक्ष मध्य प्रदेश आणि राजस्थान येथे आगामी निवडणकीतून बाहेर पडेल असे म्हटले आहे.

आपचे राष्ट्रीय प्रवक्ता आणि दिल्लीचे आरोग्य मंत्रा सौरभ भारद्वाज यांनी गुरूवारी काँग्रेस पक्षावर टीका करताना सांगितले की, काँग्रेस दिल्ली आणि पंजाबमध्ये निवडणूकांमधून माघार घेतली तरा 'आप' देखील मध्य प्रदेश आणि राजस्थाना निवडणूकांमधून माघार घेईल. दिल्लीत प्रशासकिय सेवांच्या नियंत्रणावरून केंद्र सरकार आणि दिल्लीतील आपचे सरकार आमनेसामने आले आहे. यादरम्यान 'आप'ला केंद्र सरकारने आणलेल्या अध्यादेशाविरोधात काँग्रेसकडून पाठिंब्याची आपेक्षा आहे.

arvind kejriwal
Indurikar Maharaj : 'ते' वक्तव्य इंदुरीकर महाराजांना भोवलं! औरंगाबाद खंडपीठाचे गुन्हा दाखल करण्याचे आदेश

दिल्लीत गुरूवारी पत्रकारांशी बोलताना आप नेते भारद्वाज म्हणाले कीष काँग्रेसला दिल्लीत २०१५ आणि २०२० च्या विधानसभा निवडणूकीत एकही जागा जिंकता आली नाही. जर काँग्रेस तयार असेल तर त्यांनी दिल्लीजपंजाब निवडणूका लढवल्या नाहीत तर आम्ही देखील मध्य प्रदेश-राजस्थान येथे निवडणूका लढवणार नाहीत.

arvind kejriwal
Ajit Pawar : सरकार टिकवण्यााठी ते ४० आमदार… ; अजित पवारांचे अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून गंभीर आरोप

भारद्वाज यांनी काँग्रेसवर कॉपी-कट-काँग्रेस झाल्याचा आरोप केला आहे. पक्षात अजून बऱ्याच कमतरता आहेत, म्हणून ते आम आदमी पक्षाचा जाहिरनामा चोरत आहेत. ते म्हणाले की, काँग्रेस देशातील सर्वात जुना पक्ष आहे. मात्र आज सी-सी-सी, कॉपी-कट-काँग्रेस बनला आहे. हे अरविंद केजरीवालचं सर्व लुटत आहेत. यांना स्वतःचं असं काहीच माहिती नाही. काँग्रेसकडे फक्त नेतृत्वाचीच नव्हे तर विचारांची देखील कमतरता असल्याचे उघड होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com