
आंदोलन न करण्याचा काश्मिरी पंडितांना सल्ला
श्रीनगर : काश्मिरी पंडितांनी कोणतीही निवेदने प्रसिद्ध करू नयेत आणि आंदोलनापासून दूर राहावे, असा सल्ला येथील पोलिसांनी दिला आहे. काश्मिरी पंडितांना काश्मीरमधून बाहेर काढण्याच्या हेतूने त्यांच्यावर हल्ले केले जात आहेत. यामुळे शत्रूला त्यात ते यशस्वी होतील, असे निवेदन करू नये, असे आवाहन काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी केले. काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातील सरकारी अधिकारी राहुल भट या काश्मिरी पंडिताची हत्या दहशतवाद्यांनी गेल्या आठवड्यात केली.
या हत्येच्या निषेधार्थ शेखपुरा बडगाम येथे काश्मिरी पंडितांचा एक गट आंदोलन करीत आहे. विजय कुमार यांनी त्यांच्याशी चर्चा केली. येथील जनतेने सरकारविरोधात उभे राहावे, हे शत्रूचे उद्दिष्ट आहे. ते सफल होईल अशी कोणतीही कृती करू नये, असे आवाहन त्यांनी केले.लष्कर, पोलिस आणि अन्य सुरक्षा दले अशा गोष्टींविरोधात लढत आहेत आणि तुम्हालाही त्यांच्याविरोधात लढा द्यावा लागणार आहे. तुमचे हौतात्म्य आणि बलिदान हे अमूल्य आहे. तुम्हाला द्यावे लागणारे बलिदान हे सुरक्षा दलासमान आहे, असेही विजय कुमार म्हणाले. सुरक्षेत ज्या त्रुटी आहेत, त्या काढून टाकल्या जातील आणि दहशतवाद संपुष्टात आणला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी काश्मिरी पंडितांनी दिली.
Web Title: Appeal Of Inspector General Of Police Advise Kashmiri Pandits Not To Agitate Srinagar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..