'या' आहेत काँग्रेसच्या पहिल्या तृतीयपंथी पदाधिकारी

वृत्तसंस्था
बुधवार, 9 जानेवारी 2019

नवी दिल्लीः काँग्रेस पक्षाच्या पहिल्या तृतीयपंथी पदाधिकारी म्हणून अप्सरा रेड्डी यांची मंगळवारी (ता. 8) नियुक्ती करण्यात आली आहे. एका कार्यक्रमादरम्यान पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी अप्सरा यांची ऑल इंडिया महिला काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याचे जाहिर केले. अप्सरा या पक्षाच्या पहिल्या तृतीयपंथी पदाधिकारी ठरल्या आहेत.

अप्सरा रेड्डी यांनी पत्रकार म्हणून काम केले आहे. लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचाराची अनेक प्रकरणे त्यांनी बाहेर काढली आहेत. मूळ आंध्रप्रदेशमधील असलेल्या अप्सरा यांनी त्यांचे शालेय शिक्षण चेन्नई येथून पूर्ण केले आहे. पुढे त्यांनी ऑस्ट्रेलियातील मोनाश विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी घेतली. शिवाय, लंडनमधून पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. ऑस्ट्रेलिया आणि लंडन येथे काम करत असताना त्यांनी तृतीयपंथींच्या अधिकारासाठी काम केले आहे. अण्णा द्रमुक पक्षाच्या प्रवक्त्या म्हणूनही त्यांनी काम केले. मात्र, जयललिता यांच्या निधनानंतर त्यांनी पक्ष सोडला होता. भारतीय जनता पक्षामध्येही त्या होत्या.

काँग्रेस हा लोकांची सेवा करण्यासाठी चांगला पक्ष आहे. पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी हे तरुण आणि विकासाची दृष्टी असलेले व्यक्तिमत्त्व आहे. पक्षाच्या माध्यमातून महिलांचे अनेक प्रश्न सोडवता येतील. राजकारणात स्त्री किंवा पुरुष महत्त्वाचं नाही तर तुम्ही करत असलेले काम महत्त्वाचे आहे, असे अप्सरा सांगतात.

Web Title: Apsara Reddy becomes first transgender office bearer in Congress