esakal | लष्करी कर्मचारीच निघाला ‘घरचा भेदी’; ‘ISI’च्या हस्तकासह दोघांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

लष्करी कर्मचारीच निघाला ‘घरचा भेदी’; ‘ISI’च्या हस्तकासह दोघांना अटक

लष्करी कर्मचारीच निघाला ‘घरचा भेदी’; ‘ISI’च्या हस्तकासह दोघांना अटक

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयला भारतीय लष्कराची गोपनीय माहिती देणाऱ्या हस्तकासह दोघांना आज दिल्ली पोलिस आणि लष्कराच्या गुप्तचर शाखेने अटक केली. यात लष्करी सेवेतील एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. हबीबुर रेहमान (वय ४१) आणि परमजित सिंह असे दोन आरोपीची नावे असून त्यांची चौकशी सुरू आहे. हबीबुर रेहमान हा कंत्राटदार असून तो पोखरण येथे लष्करी छावण्यांना भाजीपाला पुरवठा करण्याचे काम करायचा.

हेही वाचा: अल्पवयीन मुलाच्या हत्त्येप्रकरणी पोलिसांची हत्तीणीवर कारवाई!

राजस्थानच्या पोखरण येथे हबीबुर रेहमान याच्या घरी दिल्ली पोलिसांनी छापा घातला असता तेथे लष्करासंबंधीचे संवेदनशील कागदपत्रे आढळून आली. परमजित सिंह हा सध्या आग्रा येथील छावणीत लिपिक म्हणून काम करत आहे. तत्पूर्वी तो पोखरण येथील लष्करी कार्यालयात काम करायचा. तेथे हबीबुर रेहमानशी संपर्क आल्यानंतर त्यांची मैत्री वाढली. रेहमानने त्याला लष्कराचे गोपनीय कागदपत्रे देण्याची मागणी केली आणि त्या बदल्यात हवालामार्गे पैसा दिला जाईल, असे सांगितले. रेहमानचे पाकिस्तानातील सिंध प्रांतात नातेवाईक असून तो त्यांना दोन वर्षापूर्वी भेटावयास गेला होता. तेथे तो आयएसआयच्या संपर्कात आला आणि भारतात परतल्यानंतर आयएसआयचा हस्तक बनला. दोन्ही आरोपींच्या अनेक खात्यांचा शोध लागला आहे. परमजित सिंहला आतापर्यंत पाकिस्तानकडून सुमारे ९ लाख रुपये मिळाले आहेत. या नेटवर्कमध्ये आणखी काही जण सामील असू शकतात, असा पोलिसांना संशय आहे.

हेही वाचा: 'ही राजकीय सूडवृत्तीच'; मानवाधिकार आयोगाच्या रिपोर्टवर ममतांचा पलटवार

व्हॉटसअपद्वारे माहिती दिली

नायक लिपिक परमजित याने हबीबुर रेहमानला लष्करासंबंधीची गोपनीय माहिती, प्रशिक्षणाशी निगडित माहिती, गुप्त ठिकाणांचे नकाशे, गुप्त कागदपत्रे उपलब्ध करून दिली होती. ही माहिती हबीबुर रेहमान हा पाकिस्तानात असलेल्या आपल्या म्होरक्यांना व्हॉटसअपद्वारे पाठवत होता.

loading image