कोरोनाविरोधात लष्कराचे अभियान ‘को-जीत’ सुरू

लष्कर, हवाई दल आणि नौदल ही तिन्ही दलांचा यात सहभाग आहे. रुग्णांची वाढती संख्या आणि तोकडी पडणारी वैद्यकीय व्यवस्था याला सर्वांनाच तोंड द्यावे लागत आहे.
Dr Madhuri Kanitkar
Dr Madhuri KanitkarSakal

नवी दिल्ली - सशस्त्र दलांनी (Armys) आता कोरोनाविरोधात (Corona) युद्ध (War) छेडले आहे. कोरोनाशी लढण्यासाठी वैद्यकीय पायाभूत सुविधा बळकट करणे, रुग्णालयांसाठी वैद्यकीय ऑक्सिजनची (Oxygen) साखळी तयार करण्याबरोबरच लोकांना मानसिक आधार देण्यासाठी लष्कराने ऑपरेशन ‘को-जीत’ Operation Co-Jit) सुरू केले. (Armys campaign against Corona begins Co Jit)

लष्कर, हवाई दल आणि नौदल ही तिन्ही दलांचा यात सहभाग आहे. रुग्णांची वाढती संख्या आणि तोकडी पडणारी वैद्यकीय व्यवस्था याला सर्वांनाच तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे लष्करी अधिकारी आणि कर्मचारी स्थानिक प्रशासनाला कोरोनाशी लढण्यासाठी मदत देण्याबरोबरच जवान हे ऑक्सिजन पुरवठ्याची साखळी निर्माण करणे, कोरोना रुग्णांसाठी बेडची सुविधा तयार करणे या कामी मदत करणार आहेत. एकात्मिक संरक्षण दलाच्या (वैद्यकीय) उपप्रमुख लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर या मोहिमेचा समन्वय करीत आहेत. त्या म्हणाल्या, की प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणेच लष्करी सेवेतील कर्मचारी देखील दिवसरात्र काम करीत आहेत. कोरोनामुळे माजी सैनिक देखील सैन्याच्या रुग्णालयामध्ये येत आहेत. त्यामुळे पुणे आणि दिल्ली सारख्या शहरांमध्ये ४००-५०० बेड केवळ संरक्षण दलातील कर्मचारी आणि माजी सैनिकांसाठी तयार ठेवले.

Dr Madhuri Kanitkar
योगींच्या आमदारांवर कोरोनाचा कहर; आतापर्यंत इतके मृत्यूमुखी

सध्याची स्थिती ही युद्धापेक्षा वेगळी नाही. कोविडवर विजय मिळविण्यासाठी लढा म्हणून त्याला को-जीत म्हटले आहे. आमचे सर्व सहकारी हे उत्साहाने, झोकून देऊन काम करीत आहेत. कारण प्रत्येक जवान हा संकटाच्या काळात लढण्यासाठी प्रशिक्षित केलेला असतो, तर मैदान कधीच सोडत नाही. आम्ही केवळ डॉक्टर नव्हे; तर जवानही आहोत. त्यामुळे या परिस्थितीवर मात करण्यासाठी आम्ही युद्धपातळीवर काम करीत आहोत. त्यामुळे संरक्षण दलातील बाधित रुग्णांची काळजी आणि सामान्य प्रशासनाला मदत यासाठी तयार आहोत, असे त्यांनी सांगितले. काही लष्करी रुग्णालयांमध्ये स्वत:चे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प आहेत. परंतु सध्याच्या काळात पाहता, या सुविधा आणखी वेगाने वाढविण्याची गरज आहे. हवाई दलाने क्रायोजेनिक कंटेनरच्या माध्यमातून ऑक्सिजन आणला आहे. नौदलानेही अंदमान-निकोबार, लक्षद्विप याठिकाणी ऑक्सिजन पोचविण्याचे काम केले. देशभरात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी मदत केली आहे, असे त्यांनी सांगितले.

कोरोनाबाधित जवानांना दिलासा देण्याचे कार्य

कोरोना काळात सेवा बजावणाऱ्या जवानांनाही कोरोनाने घेरले आहे. याबाबत त्या म्हणाल्या, रुग्णाला वैद्यकीय उपचारांबरोबर तणावाच्या काळात तो बरा होईल, असा विश्‍वासही द्यावा लागतो. असा विश्‍वास कुणी देत असेल, तर रुग्णाच्या चेहऱ्यावर हसू फुलते, यावर माझा विश्‍वास आहे. म्हणूनच लष्करातील काहीजण बाधित झाल्याचे समजल्यानंतर जराही वेळ न घालवता आम्ही त्यांच्यापर्यंत पोचलो. या काळात त्यांना आम्ही त्यांच्याबरोबर आहोत, हा दिलासा त्यांना देणे फार महत्त्वाचे असते, असे लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर म्हणाल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com