
बंगळूर : देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या अभियंता अतुल सुभाष यांच्या आत्महत्येप्रकरणी सुभाषची पत्नी लिखिता, तिची आई आणि भावाला बंगळूर पोलिसांनी अटक केली आहे. उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथून त्यांना ताब्यात घेतले असून, त्यांची १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.