काश्मीरमध्ये अशांतता कायम; हजारो नागरिक रस्त्यावर

वृत्तसंस्था
Sunday, 11 August 2019

तात्पुरती अशांतता : परराष्ट्र मंत्रालय 
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी काश्‍मीरमधील अशांतता तात्पुरत्या स्वरुपाची असल्याचे सांगितले. श्रीनगरबाहेर सर्व काही सुरळीत सुरू आहे. लोकांचे आयुष्य नेहमीप्रमाणे चालू असून, व्यवसायही व्यवस्थितपणे सुरू आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा विचार करुन लवकरच संचारबंदी मागे घेण्यात येईल. 

श्रीनगर : जम्मू आणि काश्‍मीर राज्याचा विशेष दर्जा काढून टाकणारे कलम 370 रद्द करण्यास राज्यातील जनेतेने मोठ्या प्रमाणात विरोध सुरू केला आहे. संचारबंदी असतानाही हजारो नागरिक आता रस्त्यावर उतरू लागले आहेत. केंद्र सरकारने मात्र, अशी कोणतीही निदर्शने झाल्याचा इन्कार केला आहे. 

श्रीनगरमध्ये शुक्रवारी सुमारे दहा हजार नागरिकांनी सामूहिक प्रार्थनेनंतर केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात निदर्शने केली. यामध्ये महिला मुलींसह लहान मुलांचाही समावेश होता. त्यांना पांगविण्यासाळी सुरक्षा दलांना अश्रूधुराच्या नळकांड्या आणि पेलेट गनचा वापर करावा लागला. जम्मू आणि काश्‍मीरमध्ये संचारबंदी लागू केल्यानंतरचे ही सर्वांत मोठी निदर्शने होती. राज्यातील दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा आठवडाभर बंद असून, केंद्र सरकारने सुमारे पाचशेहून अधिक राजकीय व फुटीरतावादी नेत्यांना ताब्यात घेतले आहे. 

पेलेट गनच्या माऱ्यात जखमी झालेल्या काही नागरिकांना श्रीनगरमधील शेर-ए-काश्‍मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस संस्थेत दाखल करण्यात आले आहे. पेलेट गनमुळे जखमी झालेल्या बारा जणांना दाखल करण्यात आल्यास संस्थेने दुजोरा दिला. 

तात्पुरती अशांतता : परराष्ट्र मंत्रालय 
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी काश्‍मीरमधील अशांतता तात्पुरत्या स्वरुपाची असल्याचे सांगितले. श्रीनगरबाहेर सर्व काही सुरळीत सुरू आहे. लोकांचे आयुष्य नेहमीप्रमाणे चालू असून, व्यवसायही व्यवस्थितपणे सुरू आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा विचार करुन लवकरच संचारबंदी मागे घेण्यात येईल. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article 370 Tear gas at Kashmir rally India denies happened