VIDEO | चक्क १००० किलो भंगारापासून बनवली कार, तीन महिन्यात ३ लाखांचा खर्च | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ambassador Car Made Through Scrap By Indore Artist

VIDEO | चक्क १००० किलो भंगारापासून बनवली कार, तीन महिन्यात ३ लाखांचा खर्च

इंदूर : भारतात कल्पनेतील गोष्टी वास्तवात आणणाऱ्यांची कमतरता नाही. मग तो बीडचा शाळकरी मुलगा असो ज्याने कांदा कापताना आईच्या डोळ्यातून पाणी येते म्हणून एक आगळा-वेगळा चाकू बनवला आहे. इंदूरमध्ये (Indore) एका कलाकाराने काय बनवला असेल ? तुम्ही सांगू शकता का? बरं जाऊ द्या. तर या कलाकाराने चक्क जवळपास १००० किलोग्रॅम भंगार (Scrap) वापरुन अॅम्बेसिडर कार बनवली आहे. कार कशी बनवली ? त्यासाठी किती खर्च आला याविषयी कलाकाराने एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले. (Artist Made Ambassador Car Through 1000 Kg Scrap In Indore)

हेही वाचा: अवघ्या १८ महिन्यांच्या बाळाला दुर्मिळ आजार, १६ कोटींच्या इंजेक्शनानं मिळालं 'जीवदान'

एएनआयशी बोलताना कलाकार सुंदर गुर्जर म्हणतात, की ही कार बनवण्यासाठी ७०० किलो नट आणि बाकी स्क्रॅप मेटलचा वापर करण्यात आला आहे. ती बनवण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागला आहे आणि तीन लाख इतका खर्च आला आहे. ओरिजनल बाॅडीला कटरने कापून नटने फिट केले आहे, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Artist Made Ambassador Car Through 1000 Kg Scrap In Indore

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Madhya PradeshScrap
go to top