अरुणाचलला 'वर्तक'चे वरदान

सीमा रस्ता संघटनेच्या (बीआरओ) वर्तक प्रकल्पांतर्गत अरुणाचल प्रदेशच्या विविध भागात रस्ते तयार करत वाहनांची ये-जा ही अत्यंत सुरुळीत करण्यावर भर दिला जात आहे.
vartak project
vartak projectsakal
Summary

सीमा रस्ता संघटनेच्या (बीआरओ) वर्तक प्रकल्पांतर्गत अरुणाचल प्रदेशच्या विविध भागात रस्ते तयार करत वाहनांची ये-जा ही अत्यंत सुरुळीत करण्यावर भर दिला जात आहे.

निचीपू (अरुणाचल प्रदेश) - सीमा रस्ता संघटनेच्या (बीआरओ) वर्तक प्रकल्पांतर्गत अरुणाचल प्रदेशच्या विविध भागात रस्ते तयार करत वाहनांची ये-जा ही अत्यंत सुरुळीत करण्यावर भर दिला जात आहे. याचाच एक भाग म्हणून निचिपू पास येथे निचिपू बोगदा तयार करण्यात येत असून यामुळे आता अपघात टाळण्यास मदत होईल. त्याचबरोबर लष्करी वाहनांना आता कोणत्याही हवामानाच्या परिस्थितीत सहजपणे तवांग व त्यापुढील दुर्गम भागात जाणे शक्य होणार आहे. इतकंच नाही तर पुढील चार ते पाच महिन्यात हा बोगदा कार्यरत होईल. अशा विकास कामांमुळे 'वर्तक' प्रकल्प खऱ्या अर्थाने अरुणाचलसाठी वरदान ठरत आहे.

तेजपूर ते तवांग प्रवासादरम्यान निचिपू पास येथे सर्वात मोठी समस्या उद्भवते ती म्हणजेच दाट धुके. संपूर्ण घाट वळणाचा आणि उंच भागातील या परिसरात धुक्यामुळे वाहन चालविणे धोक्याचे ठरतात. सायंकाळी येथे वाहने चालविणे देखील टाळले जाते. धुक्यापासून सुटका करण्यासाठी या बोगद्याचा वापर केला जाऊ शकतो. याबाबत बीआरओ सामान्य राखीव अभियंता दलातील (ग्रेफ) कार्यकारी अभियंता तार्केश्वर सातपुडके यांनी सांगितले, " बोगद्याच्या कामाची सुरवात १२ ऑक्टोबर २०२० मध्ये झाली होती. यामुळे केवळ प्रतिकूल वातावरणात वाहनांची सुरक्षित हालचाल सुनिश्चित करणेच नाही तर दाट धुके असलेला ७ किलोमीटरचा मार्ग कमी होईल. विकासाची उद्दिष्टे साध्य करण्याच्या दिशेने बीआरओचे हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे."

बीआरओ देतेये आधुनिक तंत्रज्ञानावर भर -

या बोगद्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. आधुनिक विद्युतीकरण प्रणालीसह अग्निशामक उपकरणे चालवल्या जाणार्‍या विद्युत नियंत्रण आणि एससीडीए कंट्रोलिंग सिस्टीम उपलब्ध आहे. तसेच यामध्ये थ्री मॉनिटरिंग आणि प्रोअॅक्टिव्ह सपोर्ट सिस्टीमसारख्या तंत्रज्ञानाद्वारे सतत निरीक्षणे करत काम केले जात आहे. या बोगद्यामुळे दोन्ही बाजूंनी पादचाऱ्यांना सुरक्षित हालचाल करता येणार आहे. बोगद्यात वीज केबल्स, ओएफसी केबल्स आणि युटिलिटी लाईन्ससाठी डक्ट बसवले जातील, ज्यामुळे लोकांसाठी पायाभूत सुविधा मजबूत होतील, असे ग्रेफच्या सहाय्यक कार्यकारी अभियंता श्वेता गुप्ता यांनी नमूद केले.

निचिपू बोगद्याबबत

- बोगदा ५०० मीटर लांब

- बालीपारा-चारदुआर-तवांग (बीसीटी) मार्गावरील ८२ आणि ८८ किलोमीटर अंतर

- निचिपू पास येथील धुके टाळता येणार

- वाहतूक आणि लष्करी ताफ्यांच्या प्रवास सुखकर होणार

- दरडी व धुके टाळत लष्करी आणि नागरी वाहनांच्या सुरक्षित प्रवास सुनिश्चित

- कार्बन उत्सर्जनामुळे होणारे परिणाम कमी होईल

- बोगद्याचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी 'न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग' पद्धतीचा (एनएटीएम) वापर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com