Arvind Kejriwal : सर्व झोपड्या तोडण्याचा कट : अरविंद केजरीवाल
Delhi Protest : दिल्लीतील झोपड्या हटवण्यामागे भाजपचा कट असून गरीबांवर अन्याय चालला आहे, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला. झोपड्यांवर बुलडोझर चालवणाऱ्या सरकारला जनता उत्तर देईल, असा इशारा त्यांनी दिला.
नवी दिल्ली : दिल्लीतील सर्व झोपड्या तोडण्याचा सत्ताधारी भाजपचा कट असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे (आप) समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी रविवारी जंतर मंतरवर आयोजित करण्यात आलेल्या ‘घर-रोजगार बचाओ’ आंदोलनात बोलताना केला.