कोरोनाकाळातही दिल्लीची आरोग्यव्यवस्था भक्कम;अरविंद केजरीवाल यांचा दावा

कोरोनाकाळातही दिल्लीची आरोग्यव्यवस्था भक्कम;अरविंद केजरीवाल यांचा दावा

नवी दिल्ली - देशाच्या राजधानीत कोरोनाने संसर्गाची अत्युच्च पातळी गाठली. मात्र, गेल्या काही वर्षांत केलेल्या सुधारणा व सुयोग्य व्यवस्थापनामुळे दिल्लीची आरोग्य व्यवस्था कोसळली नाही, असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला. 

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमात बोलताना ते पुढे म्हणाले, की अमेरिका, न्यूयॉर्कसारख्या शहरांमध्ये पायाभूत आरोग्य सुविधा कोलमडून पडली. मात्र, गृहविलगीकरणासारख्या उपायांमुळे दिल्लीत अशी परिस्थिती टळली. गहविलगीकरणाची सुरवात सर्वप्रथम दिल्लीपासून झाली. राजधानीत ३.१२ लाख जणांनी गृहविलगीकरणातून कोरोनावर मात केली. जगातील पहिल्या प्लाझ्मा बॅंकेची स्थापना दिल्लीतच झाली, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

कोरोना साथीमुळे दिल्ली सरकारला कर महसुल जमा करण्यात अडचणी आल्या. अशा परिस्थितीतही आप सरकारने कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर दिले. त्याचप्रमाणे, विनामूल्य वीजेसारख्या प्रमुख योजनाही पूर्वीप्रमाणेच सुरू ठेवल्या, अशी माहितीही केजरीवाल यांनी दिली. मार्चपर्यंत घरपोच रेशन पोचविण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. त्यातून या योजनेत क्रांतीकारक बदल होतील, असाही आशावाद केजरीवाल यांनी व्यक्त केला. 

दिल्लीचा कोरोना लढा 
गृहविलगीकरणातून कोरोनावर मात करणारे -  ३.१२ लाख 
प्लाझ्मा उपचार घेणारे  - ४,९२९ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com