काय आहे शरद पवार पॅटर्न? जो केजरीवाल, सिसोदियादेखील आज वापरतात

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया उत्पादन शुल्क घोटाळा प्रकरणी गेल्या दोन दिवसा पासुन CBI चौकशीच्या फेऱ्यात
 Manish Sisodia
Manish Sisodiaesakal

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया उत्पादन शुल्क घोटाळा प्रकरणी गेल्या दोन दिवसा पासुन CBI चौकशीच्या फेऱ्यात आहेत. आणि त्याच्या आडचणीत पुन्हा वाढ होणार आहे. कारण हा तपास लवकरच ED ला सोपवला जावू शकतो. या प्रकरणामुळे अरविंद केजरीवाल यांच्या मिस्टर क्लीनच्या प्रतिमेला धक्का पोहोचणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र मनीष सिसोदियापासून ते अरविंद केजरीवालांपर्यंत सर्वांनी यावर बॅकफूटवर जाण्यास नकार दिला आहे. हे दोघेही ट्विटर वरून भाजपवर जोरदार टिका करत आहे. मनीष सिसोदिया म्हणाले की, भाजप अरविंद केजरीवालांना घाबरत आहे आणि त्यामुळेच हे सर्व केले जात आहे.

तसेच सोमवारी दावा केला आहे की त्यांना भाजप मध्ये प्रवेश करण्याची ऑफर दिली होती. भाजपवाले म्हणाले की तुम्ही भाजप मध्ये प्रवेश केला तर तुमच्या वर चालू असलेल्या चौकशी मधून बाहेर काढू. त्यावर ते म्हणाले की मी राजपूत आहे, मी माझा शिरच्छेद करेन, पण झुकणारऱ्यां सारखा मी नाही, असेही त्यांनी सांगितले. अरविंद केजरीवाल आणि सिसोदिया यांची एजन्सीवर हल्ला करण्याची रणनीती शरद पवार यांच्याशीच जुळते. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांपूर्वी जेव्हा त्यांना ईडीची नोटीस आली तेव्हा ते जास्तच आक्रमक झाले होते आणि स्वतः ईडी कार्यालयात गेले होते.

 Manish Sisodia
Manish Sisodia: मनीष सिसोदियांसारख्या व्यक्तीला भारतरत्न द्यायला हवा - केजरीवाल

शरद पवार यांच्या निर्णया नंतर राज्याच राजकारण गरम झाल होते. त्यानंतर ED कार्यालया कडून स्पष्टिकरण देत त्यांची चौकशी करणार नाही हे स्पष्ट केले. मात्र, यानिमित्ताने शरद पवार यांनी निर्माण केलेल्या वातावरणाचा फायदा राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीत झाला. त्यावेळी केंद्रीय यंत्रणांना न घाबरता खंबीरपणे उभे राहण्याची धमक शरद पवारांनी दाखवली होती. आता अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया दिल्लीत तेच करताना दिसत आहेत.

मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयने छापा टाकला तेव्हापासून ते स्वत: सोशल मीडियावर सर्व माहिती देत ​​आहेत. अरविंद केजरीवाल यांच्यापासून मनीष सिसोदिया यांच्यापर्यंत दिल्ली सरकारने केलेल्या चांगल्या कामाच्या विरोधात केंद्राचे षड्यंत्र असल्याचा प्रचार सातत्याने केला जात आहे. सत्येंद्र जैन यांच्या अटकेवरही 'आप'ने झुकण्यास नकार दिला आहे. उलट केंद्रसरकार वर सातत्याने हल्लाबोल करत आहेत.

आम आदमी पक्षाला वाटत आहे की दिल्लीतील नागरिकांना एक संदेश देता येईल. केंद्र सरकार मुद्दाम त्यांच्याविरोधात चौकशी लावत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com