Chandigarh Mayor Election: महापौरपदाच्या निवडणुकीत असं करू शकतात तर... 'इंडिया'च्या पहिल्या पराभवानंतर केजरीवालांची टीका

Chandigarh Mayor Election: पंजाबमधील चंदीगडच्या महापौरपदाच्या निवडणूक ही अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांनी एकत्र येत लढली होती.
Chandigarh Mayor Election
Chandigarh Mayor Election

Chandigarh Mayor Election Latest News : आगामी लोकसभा निवडणूकीसाठी विरोधकांची इंडिया आघाडी आणि भाजपच्या नेतृत्वातील एनडीए या दोन्हींकडून जोरदार तयारी केली जात आहे. यादरम्यान चंदीगडच्या महापौरपदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीला भाजपसमोर पराभव स्वीकारावा लागला आहे. या पराभवानंतर निवडणूकीत झालेली बेईमानी अत्यंत चिंताजनक असल्याचे आप नेते अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत

पंजाबमधील चंदीगडच्या महापौरपदाच्या निवडणूक ही अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांनी एकत्र येत लढली होती. त्यामुळे इंडिया आघाडीच्या स्थापनेनंतर इंडिया आघाडी विरुद्ध भाजप अशी थेट लढण्यात आलेली ही पहिलीच निवडणूक होती. या निवडणुकीत भाजपचे महापौरपदाचे उमेदवार मनोज सोनकर यांना 16 तर इंडिया आघाडीला 12 मतं पडली. तर 8 मतं बाद ठरली आणि निवडणुकीत भाजपचा विजय झाला.

Chandigarh Mayor Election
Hemant Soren Arrives : ४० तासांपासून 'नॉट रिचेबल' असलेले झारखंडचे मुखमंत्री हेमंत सोरेन अखेर प्रकटले!

दरम्यान आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी ही उघड फसवणूक असल्याचे म्हटले आहे. केजरीवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे, यामध्ये "चंदीगडच्या महापौरपदाच्या निवडणुकीत दिवसाढवळ्या ज्या पद्धतीने बेईमानी केली गेली, हे अत्यंत चिंताजनक आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत हे लोक एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ शकतात, तर देशातील निवडणुकीत ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. हे खूप चिंताजनक आहे." असे केजरीवाल म्हणाले आहेत.

Chandigarh Mayor Election
Chandigarh Mayor Election: पहिल्याच परीक्षेत 'इंडिया' आघाडी नापास, भाजपाची 'फर्स्ट क्लास'कामगिरी

चंदीगड महापौरपद भाजपकडे गेल्यानंतर आम आदमी पक्षाने हे भाजपचं षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे. जाणीवपूर्वक ८ नगरसेवकांची मत बाद करुन भाजपच्या उमेदवाराला अप्रत्यक्षपणे मदत केली असल्याचा दावा देखील करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com