Arvind Kejriwal: "भाजपच्या अधर्माच्या राजकारणाच्या नाशासाठी 'कृष्ण' घेणार जन्म"; अरविंद केजरीवालांचा हल्लाबोल

दिल्ली विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री केजरीवाल यांनी भाषणाची सुरुवात भगवतगीतेतील श्लोकाने केली.
amit shah- narendra modi, arvind kejriwal
amit shah- narendra modi, arvind kejriwal

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे राजकारण अधर्माचे असून घटनात्मक आणि कायदेशीर तरतुदींचा भंग करून सध्या देश चालविला जात आहे. या अधर्माचा नाश करण्यासाठी कृष्णाचा जन्म या पृथ्वीवर होईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज भाजपचा समाचार घेतला. (arvind kejriwal says krishna will take birth to destroy bjp politics of lawlessness)

amit shah- narendra modi, arvind kejriwal
Congress SP Alliance: सपानं 31 जागांवर दिले उमेदवार, काँग्रेसशी युतीचं काय? अखिलेश यादव म्हणाले...

दिल्ली विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री केजरीवाल यांनी भाषणाची सुरुवात भगवतगीतेतील श्लोकाने केली. जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अधर्म होतो. त्या त्यावेळी पृथ्वीवर एका कृष्णाचा अवतार होतो, असे सांगून मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले, "चंडीगड महापौरपदाची निवडणूक ही धर्म व अधर्माची लढाई होती. अधर्मी कितीही ताकदवान असला तरी शेवटी विजय हा धर्माचा होतो. हे पुन्हा या निवडणुकीने सिद्ध झाले आहे. भाजपने अधर्माने आजपर्यंत अनेक आमदार खरेदी केले. अनेक राज्ये उलथून टाकली" (Marathi Tajya Batmya)

amit shah- narendra modi, arvind kejriwal
Manoj Jarange: "तुकाराम महाराजांबाबत सपशेल माफी पण बारस्कर हा भोंदू"; जरांगेंचा हल्लाबोल

सरन्यायाधीशांचे आभार

अधर्म जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अधिक होतो, तेव्हा तेव्हा कृष्ण जन्माला येतो. भारतात सरन्यायाधीशांच्या रूपाने देशात कृष्ण जन्माला आला आहे. या निकालासाठी मुख्यमंत्र्यांनी सरन्यायाधीशांना धन्यवाद दिले व त्यांचे आभार मानले. (Latest Marathi News)

शेतकरी आंदोलन करीत आहे. त्याची या सरकारला फिकीर नाही. ही बेमूर्वतखोरी कुठून आली. ३७० जागांच्या जप कशाच्या आधारावर हे सरकार करीत आहे. ईव्हीएम मॅनेज केले जात आहे. तरीही प्रत्येकाला मतदानाला जाणे आवश्यक आहे. भाजपची ही बनवाबनवी आपल्याला उघडी पाडावी लागेल, असे सांगून मुख्यमंत्री केजरीवाल यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

amit shah- narendra modi, arvind kejriwal
Ajay Barskar: जरांगेंवर गंभीर आरोप करणं अजय बारस्करांना भोवलं! पक्षानं केली मोठी कारवाई

जय श्रीरामने भाषणाचा शेवट

जवळपास २० मिनिटांच्या भाषणात मुख्यमंत्री केजरीवाल यांनी भाजपच्या नेत्यांवर तोंडसुख घेतले परंतु भाषणाचा शेवट करताना त्यांनी जय श्रीरामाचा नारा दिला. यावेळी आपच्या आमदारांनी सुद्धा याच नाऱ्याचा पुनरुच्चार केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com