दिल्लीत पुन्हा 'आप'लं सरकार; केजरीवाल यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

वृत्तसंस्था
रविवार, 16 फेब्रुवारी 2020

- तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी आज (रविवार) दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी केजरीवाल यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. केजरीवाल आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिल्लीतील रामलीला मैदान येथे हा शपथविधी सोहळा पार पडला. केजरीवाल यांच्या या शपथविधी सोहळ्याच्या व्यासपीठावर सामान्य नागरिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या काही जणांना स्थान देण्यात आले आहे. तसेच, काही शिक्षकही उपस्थित आहेत. केजरीवाल यांच्यासह इतर 6 आमदारांनाही मंत्रिपदाची शपथ देण्यात आली.

आमदारांसोबत बैठक

केजरीवाल यांनी शनिवारी रात्री आम आदमीच्या नवनिर्वाचित आमदारांबरोबर दिल्लीच्या विकासकामांवर चर्चा केली. दिल्लीतील कामांबाबत प्राधान्यक्रम ठरविण्यात आला. दिल्लीला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनविण्याच्या दृष्टीने रोडमॅप तयार करण्यात येणार आहे. 

दहा वाजता घेणार होते शपथ 

अरविंद केजरीवाल यांचा शपथविधी सोहळा दहा वाजता नियोजित होता. मात्र, दुपारी बारानंतर त्यांचा शपथविधी पार पडला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arvind Kejriwal sworn as CM of Delhi