मंदिर, मशिदीला भेट देऊन राष्ट्रनिर्माण होणार नाही- केजरीवाल

वृत्तसंस्था
रविवार, 16 सप्टेंबर 2018

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. केजरीवाल यांनी म्हटले आहे की, मंदीर आणि मशीदीला भेट देऊन राष्ट्रनिर्माण होणार नाही, मोदी आणि राहुल गांधी यांनी धार्मिक स्थळांना दिलेल्या भेटीवरुन त्यांनी टीका केली आहे.

नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. केजरीवाल यांनी म्हटले आहे की, मंदीर आणि मशीदीला भेट देऊन राष्ट्रनिर्माण होणार नाही, मोदी आणि राहुल गांधी यांनी धार्मिक स्थळांना दिलेल्या भेटीवरुन त्यांनी टीका केली आहे.

त्याचचबरोर, राष्ट्रनिर्माण हे मंदीर मशीदीत जाऊन नाहीतर देशात चांगल्या प्रकारे शिक्षणाची सोय, उच्च दर्जाचे दवाखाने उभे करुन, चांगले रस्ते, पाणी आमि वीज या सोयी सुविधांच्या नागरिकांना पुरवून होत असतात, असे केजरीवाल यांनी ट्विट करुन सांगितले आहे.

तसेच, त्यांनी तीच रिट्वीट करुन आम आदमी पक्षाचे नेते अमित मिश्रा यांचे यांचे ट्विट जोडले आहे. त्यामध्ये अमित मिश्रा यांनी खुर्चीच्या अपेक्षेने राहुल यांना कट्टर हिंदू तर मोदी यांना मुसलमान बनवले, अशा आशयाचे ट्विट केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arvind Kejriwal takes on Narendra Modi and Rahul Gandhi says nation building will not happen by visiting temples mosques