esakal | शपथविधीला पंतप्रधान मोदी अनुपस्थित; केजरीवाल म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

शपथविधीला पंतप्रधान मोदी अनुपस्थित; केजरीवाल म्हणाले...

मोदींच्या अनुपस्थितीवर केजरीवाल म्हणाले...

शपथविधीला पंतप्रधान मोदी अनुपस्थित; केजरीवाल म्हणाले...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार सत्तेवर आले. अरविंद केजरीवाल यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, ते उपस्थित राहू शकले नाही. त्यावर केजरीवाल यांनी वक्तव्य केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की पंतप्रधान मोदी दुसऱ्या कार्यक्रमात व्यस्त असल्याने ते उपस्थित राहू शकले नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिल्लीतील रामलीला मैदान येथे केजरीवाल सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. केजरीवाल यांच्या या शपथविधी सोहळ्याला अनेकांची उपस्थिती होती. तसेच यासाठी काही शिक्षकही सहभागी झाले होते. अरविंद केजरीवाल यांच्यासह इतर 6 आमदारांनाही मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. तत्पूर्वी केजरीवाल यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदींना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, ते उपस्थित राहू शकले नाही. 

मोदींच्या अनुपस्थितीवर केजरीवाल म्हणाले...

मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले होते. मात्र, दुसऱ्या कार्यक्रमात ते व्यस्त असल्याने या कार्यक्रमासाठी उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांनी आणि केंद्र सरकारने दिल्लीच्या विकासासाठी मला आशीर्वाद द्यावा, ही अपेक्षा व्यक्त करतो. 

loading image