esakal | विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ बरा नाही; अरविंद केजरीवालांचे मोदींना पत्र
sakal

बोलून बातमी शोधा

Kejriwal_and_Modi

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना अंतिम वर्षांच्या परीक्षा न घेण्याचा आग्रह केला आहे. केजरीवाल यांनी यासंदर्भात मोदींना पत्र लिहिलं आहे.

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ बरा नाही; अरविंद केजरीवालांचे मोदींना पत्र

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना अंतिम वर्षांच्या परीक्षा न घेण्याचा आग्रह केला आहे. केजरीवाल यांनी यासंदर्भात मोदींना पत्र लिहिलं आहे. केंद्र सरकार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) विद्यार्थ्यांचे व्यापक हित लक्षात घेऊन आपल्या निर्णयात बदल करावा आणि अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करुन विद्यार्थ्यांचं भविष्य वाचवावं, असं ते म्हणाले आहेत.

"भारत-चीन संघर्ष झाल्यास डोनाल्ड ट्रम्प भारताला साथ देणार नाहीत"
केजरीवाल यांनी शनिवारी यासंदर्भात ट्विट केले. दिल्ली विद्यापीठाच्या आणि केंद्र सरकारच्या अन्य विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यासाठी आणि त्यांचं भविष्य वाचवण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्तीगतरित्या हस्तक्षेप करावा असा मी आग्रह करतो, असं ते म्हणाले आहेत.

यूजीसीने विद्यापीठ आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन किंवा ऑफनाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. यूजीसीच्या या निर्णयावर लाखो विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यूजीसीचा हा निर्णय चुकीचा असून तो बदलला जावा अशी मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे.

अकरावीला अॅडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी; यंदा जागा वाढणार!
केजरीवाल यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात एनएलयू आणि आईआईटीचे उदाहरण दिले आहे. या संस्थानी विद्यार्थ्यांना अंतिम सेमिस्टरमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे पदवी दिली आहे. त्यामुळे अन्य विद्यापीठे असं का करु शकत नाहीत? जगातील मोठमोठ्या विद्यापीठांनी कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर आंतरिक मूल्यांकनावर पदवी दिली आहे, असं ते म्हणाले आहेत.

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा आग्रह केला आहे. केंद्रीय विद्यापीठांच्या बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. दिल्ली विद्यापीठाचाही त्यात समावेश होतो. केजरीवाल यांनी यापूर्वी मानव संसाधन मंत्रालय आणि विद्यापीठ अनुदान आयोग यांना यासंदर्भात अपिल केली होती, पण ती फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी मोदींना पत्र लिहित हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

loading image