Mukesh Ambani : भारताप्रमाणेच आशियातही अंबानींच्या श्रीमंतीचा दबदबा

भारतीय अब्जाधीशांची संख्या २०० वर, संपत्तीमध्येही ४१ टक्क्यांनी वाढ
Mukesh Ambani
Mukesh Ambani Sakal

मुंबई ः अमेरिकी बिझनेस मॅगझिन फोर्ब्सने प्रसिद्ध केलेल्या २०२४ मधील जगातील सर्वांत श्रीमंताच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी नवव्या स्थानी असून, त्यांची संपत्ती ११६ अब्ज डॉलर आहे.

अंबानी यांनी जगातील नवव्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती आणि भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून आपले स्थान कायम राखले आहे. भारतातील अब्जाधीशांच्या यादीत ते पहिल्या स्थानावर आहेत. या वर्षात अब्जाधीश भारतीयांची संख्या २०२३ मधील १६९ वरून २०० वर गेली असून, त्यांची एकूण संपत्ती विक्रमी ९५४ अब्ज डॉलर आहे. वर्ष २०२३ मध्ये ती ६७५ अब्ज डॉलर होती, त्यात वर्षभरात ४१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Mukesh Ambani
Dhule Crime News : 2 कॅफेंवर ‘एलसीबी’चे छापे; अशोभनीय कृत्य

या यादीनुसार, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत भारतीय आहेत, त्यांची एकूण संपत्ती ८४ अब्ज डॉलर आहे. भारतातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल या आहेत, त्या चौथ्या क्रमांकाची श्रीमंत भारतीय आहेत, गेल्या वर्षी त्या सहाव्या स्थानावर होत्या. त्यांची एकूण संपत्ती ३३.५ अब्ज डॉलर आहे. या यादीत नव्या २५ अब्जाधीशांचाही समावेश आहे. यामध्ये मेदांताचे व्यवस्थापकीय संचालक नरेश त्रेहान, केनेस टेक्नॉलॉजीचे व्यवस्थापकीय संचालक रमेश कुन्हीकन्नन आणि लँडमार्क समूहाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेणुका जगतियानी यांचा समावेश आहे. दरम्यान, बायजू रवींद्रन आणि रोहिका मिस्त्री हे या यादीतून बाहेर पडले आहेत.

जागतिक स्तरावर पहिल्या क्रमांकाची सर्वांत श्रीमंत व्यक्ती बर्नार्ड अर्नॉल्ट ठरले आहेत. त्यांची एकूण संपत्ती २३३ अब्ज डॉलर आहे. त्यानंतर १९५ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह एलॉन मस्क दुसऱ्या स्थानावर आहेत. १९४ अब्ज डॉलर संपत्तीसह जेफ बेझोस तिसऱ्या, १७७ अब्ज डॉलर संपत्तीचे धनी मार्क झुकेरबर्गचौथ्या, तर ११४ अब्ज डॉलर संपत्तीसह लॅरी एलिसन पाचव्या स्थानावर आहेत.

या यादीत १३३ अब्ज डॉलर संपत्तीसह वॉरेन बफेट सहाव्या स्थानावर आहेत. बिल गेट्स यांची संपत्ती १२८ अब्ज डॉलर असून, ते सातव्या स्थानावर आहेत. स्टीव्ह बाल्मर आठव्या क्रमांकावर असून, त्यांची संपत्ती १२१ अब्ज डॉलर आहे, ११६ अब्ज डॉलर संपत्तीसह मुकेश अंबानी नवव्या स्थानावर आहेत. त्यानंतर ११४ अब्ज संपत्तीसह लॅरी पेज दहाव्या स्थानावर आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com