Video : जन्मदात्या आईनेही सोडली एन्काउंटर झालेल्या 'गुलाम'ची साथ, म्हणली…

asad ahmed encounter killed shooter ghulam mother says encounter is right watch video
asad ahmed encounter killed shooter ghulam mother says encounter is right watch video

उत्तर प्रदेशातील झाशी येथे गुरुवारी यूपी एसटीएफने माफिया अतिक अहमदचा धाकटा मुलगा असद अहमद आणि शूटर गुलामचा एन्काउंटर केला. त्यानंतर झाशी पोलीस आज दोघांचेही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देणार आहेत, मात्र दरम्यान शुटर गुलामची आई आणि भावाने मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. गुलामच्या आईचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

उमेश पाल हत्येतील आरोपी गुलाम हा मारला गेल्यानंतर त्याची आई खुशनुदा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यूपीएसटीएफने काहीही चुकीचे केलेले नसल्याची प्रतिक्रिया गुलामच्या आईने दिली आहे. आम्ही पत्नीला नकार देऊ शकत नाही, पण आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही असेही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

खुशनुदा म्हणाल्या की, जे वाईट काम करतात हे त्यांना आयुष्यभर लक्षात राहील. आमच्या मते (UP-STF) चुकीचे केले नाही. एखाद्याला मारून तुम्ही चूक केली आणि जेव्हा तुमच्यावर वाईट वेळ आली, तेव्हा आम्ही त्याला चूक कसे म्हणू? गुलामाचा मृतदेह स्विकारण्याच्या प्रश्नावर त्या म्हणाल्या की - मी मृतदेह घेणार नाही. त्याच्या पत्नीचा त्याच्यावर हक्क आहे, मी तिला नाकारू शकत नाही. मी माझी जबाबदारी घेते की आम्ही तो घेणार नाही.

हेही वाचा - Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

asad ahmed encounter killed shooter ghulam mother says encounter is right watch video
Video : पैशांचा पाऊस… चक्क ऑटो रिक्षात सापडंलं एक कोटींचं घबाड
asad ahmed encounter killed shooter ghulam mother says encounter is right watch video
Maharashtra Weather Update : राज्यात आजही अवकाळीची शक्यता, 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट

उमेश पाल हत्या प्रकरणातील आरोपी अतिक अहमद याचा मुलगा असद आणि शूटर गुलाम यांची झाशी येथे गुरुवारी चकमक झाली. त्याचे एन्काउंटर यूपी एसटीएफने केले. उमेश पाल यांची 24 फेब्रुवारीला हत्या झाली होती. त्यानंतर उमेश पाल यांच्यासह त्यांचे दोन सुरक्षा कर्मचारीही मारले गेले. हत्येनंतर आतापर्यंत तीन आरोपींचे एन्काउंटर झाले आहे. तर अनेक अद्याप आरोपी फरार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com