तुरुंगात बंद आझम खान यांना ओवेसींच्या AIMIM कडून ऑफर, म्हणाले… | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Asaduddin Owaisi  AIMIM party urges  SP leader Azam Khan to join the party

तुरुंगात बंद आझम खान यांना ओवेसींच्या AIMIM कडून ऑफर, म्हणाले...

असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष एआयएमआयएमने सीतापूर तुरुंगात बंद असलेले सपा आमदार आणि माजी मंत्री आझम खान यांना पत्र लिहून त्यांना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे.व्हा आझम खान यांचे मीडिया प्रभारी फसाहत अली सानू यांनी काही दिवसांपूर्वी समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर आझम खानकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला होता त्यानंतर ही ऑफर देण्यात आली आहे.

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीनचे (AIMIM) राज्य प्रवक्ते मोहम्मद फरहान यांनी जारी केलेल्या या पत्रात असे लिहिले आहे की, तुम्ही मेदांता रुग्णालयात जीवन-मरणाची लढाई करत असताना संपूर्ण देश चिंतेत आहे. तुझ्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होतो. तसेच पत्रात पुढे म्हटले आहे की, तुम्ही सकुशल सीतापूर तुरुंगात परतल्यावर लोक तुम्हाला भेटायला आले, पण अखिलेश यादव यांनी तुम्हाला भेटणे आवश्यक मानले नाही.

पत्रात असे लिहिले आहे की, "आपण सव्वीस महिने तुरुंगात रहात आहात, ज्याच्या वेदना संपूर्ण मुस्लिम समाजाला वाटत आहे, परंतु अखिलेश यादव किंवा यादव कुटुंबाला किंवा संपूर्ण समाजवादी पक्षाला याबद्दल थोडीही वेदना किंवा खेद नाही." तसेच, "2022 च्या विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव यांनी तुमचा फोटो टाकून मुस्लिमांची मते घेतली, पण जेव्हा तुम्हाला विरोधी पक्षनेते बनवण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी पाठ फिरवली."

हेही वाचा: "PM मोदी गप्प का आहेत"; 13 विरोधी पक्षांचा सरकारवर एकत्रित हल्लाबोल

आझम खान यांना एमआयएममध्ये सहभागी होण्याची ऑफर देत पत्रात लिहिले आहे की, ओवेसी यांनी तुमच्यावर होणाऱ्या प्रत्येक अत्याचाराविरोधात आवाज उठवला आहे आणि त्यांनी तुम्हाला नेहमीच आपला मोठा भाऊ मानले आहे. उत्तर प्रदेशातून भाजप आणि सपाला संपवता यावे यासाठी तुम्हाला एमआयएममध्ये सामील होण्याची विनंती करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा: 2011-2019 मध्ये भारतातील गरिबीत 12.3 टक्के घट: वर्ल्ड बँक

Web Title: Asaduddin Owaisi Aimim Party Urges Sp Leader Azam Khan To Join The Party

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..