ट्रम्प यांचे हिंदू-मुस्लिमांबद्दल वक्तव्य; ओवेसींचा सरकारला प्रश्न

वृत्तसंस्था
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

ओवेसी यांनी ट्विट करत म्हटले आहे, की भारतात हिंदू-मुस्लिम ही एक समस्या आहे का? नसेल तर डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्यावर सरकार गप्प का आहे? यावर स्पष्टीकरण न देता आपण हे स्वीकारत आहोत की आपल्याला या दोन्ही समुदायाकडून समस्या आहेत.

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीरच्या मुद्द्यावरून हिंदू-मुस्लिम वक्तव्य केल्याने एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सरकारला प्रश्न विचारले आहेत.

ओवेसी यांनी ट्विट करत म्हटले आहे, की भारतात हिंदू-मुस्लिम ही एक समस्या आहे का? नसेल तर डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्यावर सरकार गप्प का आहे? यावर स्पष्टीकरण न देता आपण हे स्वीकारत आहोत की आपल्याला या दोन्ही समुदायाकडून समस्या आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्या मध्यस्थी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्यही केले आहे. ते म्हणाले, की काश्मीर हा खूप कठीण मुद्दा आहे. तेथे हिंदू आणि मुस्लिम आहेत, त्यामुळे मी म्हणू शकत नाही की त्यांच्यात खूप सौहार्दपूर्ण वातावरण आहे. मध्यस्थीसाठी जे काही चांगले आहे ते मी करेल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Asaduddin Owaisi ask pm Narendra Modi why is your government silent on Donald Trumps statement