esakal | लखीमपूर: "आरोपीचं नाव आशिष ऐवजी आतिक असतं तर..."
sakal

बोलून बातमी शोधा

 Asaduddin Owaisi

लखीमपूर: "आशिष ऐवजी आतिक असता तर..."; ओवैसींचा हल्लाबोल

sakal_logo
By
सुधीर काकडे

उत्तर प्रदेशच्या लखीमपूरमध्ये झालेल्या घटनेवरुन सध्या देशभरात राजकारण पेटलंय. या घटनेत केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने आपल्या वाहनाखाली शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी वाराणसीमध्ये झालेल्या किसान न्याय सभेतून केंद्र सरकारवर हल्ला चढवला. त्यातच एमआएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी देखील भारतीय जनता पक्षावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

हेही वाचा: Power Crisis: "भाजपला सरकार चालवता येत नाहीए"; सिसोदियांचा प्रहार

लखीमपूर हिंसाचारात केंद्रीय गृहाराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्यामुलावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ओवैसी यांनी याच प्रकरणावरु केंद्र सरकारला धारेवर धरत त्या ठिकाणी आशिष ऐवजी आतिक असता तर त्यांच्या घरावर बुलडोझर चालवलं असतं असा आरोप केला. अजय मिश्रा हे उच्चवर्णीय असून, आगामी काळातील निवडणुका लक्षात घेता भाजपला उच्चवर्णीयांची मतं गमवायची नाहीत असं म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली.

अजय मिश्रा हे शेतकऱ्यांना सरळ करण्याची भाषा वापरतात, त्याच्या दोन दिवसांनंतर लखीमपूरची घटना घडली, या घटनेत ज्या गाडीखाली शेतकरी चिरडले गेले ती गाडी त्यांचीच आहे, मग नरेंद्र मोदी अजय मिश्रा यांना मंत्रीमंडळातून का काढत नाहीत असा प्रश्नही ओवैसी यांनी यावेळी उपस्थित केला.

loading image
go to top