AIMIM leader Asaduddin Owaisi
sakal
Owaisi’s Strong Response to Political Claims : एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपसोबत मॅच फिक्सिंगच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, "मी निवडणूक लढवत राहीन. माझ्यावरील द्वेष आणि आरोप हे दर्शवितात की मी जे करत आहे त्यात मी यशस्वी होत आहे. हे लोक मानतात की ओवेसी आणि एआयएमआयएम राजकीय संतुलन बिघडवत आहेत. मुस्लिम समुदायाचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी आम्ही राजकीय संतुलन बिघडवू."
याचवेळी ओवेसी यांनी पुढे प्रश्न केला, "जेव्हा तुम्ही बिहारमध्ये आमचे चार आमदार घेतले होते. तेव्हा ते गांधीवादी काम होते का?" ते म्हणाले, "हे लोक किती निर्लज्ज आहेत. जेव्हा ते आमदारांना फोडतात, तेव्हा ते एक फार चांगले काम आहे आणि तेच काम महाराष्ट्रातही झाले. शिवसेना दोन तुकड्यांमध्ये विभागली गेली, राष्ट्रवादी काँग्रेस दोन तुकड्यांमध्ये विभागली गेली.
तसेच ओवेसी म्हणाले, ‘’कर्नाटकातील काँग्रेस सरकारमधील आमदार पळून गेले आणि मध्य प्रदेशातात पळून गेले तर तुम्ही गोंधळ घातला. हे या लोकांचा ढोंग आहे. त्यांचा दुटप्पीपणा आहे. "तुम्ही आमचे चार आमदार फोडले आणि आम्ही पुन्हा जिंकलो""
गेल्या वर्षी झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत ओवेसींच्या पक्षाने पाच जागा जिंकल्या होत्या. त्याआधी २०२० च्या विधानसभा निवडणुकीतही एआयएमआयएमने पाच जागा जिंकल्या होत्या. मात्र, त्यांचे चार आमदार राजदमध्ये सामील झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.