50-50 नवं बिस्कीट आहे का?; ओवेसींकडून खिल्ली 

वृत्तसंस्था
Sunday, 3 November 2019

अरे हा 50-50 फॉर्म्युला नेमका काय आहे. हे काय नवीन बिस्कीट आहे. तुमचा फॉर्म्युला महाराष्ट्रातील जनतेला वाचवू शकणार आहे का? तुमचा हा फॉर्म्युला सबका साथ, सबका विकास आहे का? उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद पाहिजे असेल, तर ते दोन घोड्यावर बसू शकत नाहीत.

मुंबई : शिवसेनेकडून महाराष्ट्रात सुरु असलेले हे 50-50 काय आहे? नवं बिस्कीट आहे का? असे म्हणत एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी शिवसेनेची खिल्ली उडविली आहे.

भाजप आणि शिवसेना या युतीतील मित्रपक्षांमध्ये अद्याप महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेवरून एकमत झालेले नाही. दोन्ही पक्ष मुख्यमंत्रीपदावर दावा करत आहेत. तर, शिवसेना जे ठरले आहे त्याप्रमाणे वाटाघाटी व्हाव्यात अशी मागणी करत आहे. भाजपकडून अद्याप कोणताही चर्चेसाठी प्रस्ताव आलेला नाही. या सर्व घडामोडींवर ओवेसी यांनी जोरदार टीका केली आहे.

ओवेसी म्हणाले, की अरे हा 50-50 फॉर्म्युला नेमका काय आहे. हे काय नवीन बिस्कीट आहे. तुमचा फॉर्म्युला महाराष्ट्रातील जनतेला वाचवू शकणार आहे का? तुमचा हा फॉर्म्युला सबका साथ, सबका विकास आहे का? उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद पाहिजे असेल, तर ते दोन घोड्यावर बसू शकत नाहीत. एकिकडे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून ते आत्महत्या करत आहेत. तर दुसरीकडे शिवसेना आणि भाजपा संगीत खूर्ची खेळत आहेत. एमआयएम ना भाजपचे ना शिवसेनेचे समर्थन करणार. उद्धव ठाकरे मोदींना घाबरतात. दोन पाऊल पुढे जातात आणि तीन पाऊल मागे येतात. जर घाबरत नसाल, तर केंद्रातील आपल्या मंत्र्यांना राजीनामा द्यायला सांगा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Asaduddin Owaisi takes jibe on bjp shivsena says on what is this 50-50 formula