Asaduddin Owaisi : हिजाब घालणारी महिला MIM ची प्रमुख कधी होणार? भाजपचा खोचक सवाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Asaduddin Owaisi
Asaduddin Owaisi : हिजाब घालणारी महिला MIM ची प्रमुख कधी होणार? भाजपचा खोचक सवाल

Asaduddin Owaisi : हिजाब घालणारी महिला MIM ची प्रमुख कधी होणार? भाजपचा खोचक सवाल

हिजाब परिधान केलेली महिला भारताची पंतप्रधान म्हणून मी पाहू इच्छितो असे एआयएमआयएमचे प्रमुख असदउद्दीन ओवेसी यांनी म्हटले होते. मंगळवारी ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपला देशातील धर्मनिरपेक्षता समाप्त करायची, असा आरोपही केला होता. त्यावरच आता भाजपाने प्रतिक्रिया दिली आहे.

ओवेसी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे शहजाद पूनावाला म्हणाले, "ओवेसीजींना आशा आहे की हिजाब घातलेली मुलगी भारताची पंतप्रधान बनेल, ठीक आहे. राज्यघटना कोणालाही थांबवत नाही. मग हिजाब घातलेली मुलगी एआयएमआयएमची अध्यक्ष कधी होणार ते सांगा, त्यापासून सुरुवात करू या, असा टोलाही पुनावाला यांनी लगावला.

हेही वाचा: MNS : अमेय खोपकर विरुद्ध मनसे? एक ट्वीट आणि पक्षापासून फारकत घेतल्याची चर्चा

ओवेसी यांनी आपल्या पत्रकार परिषदेत शिक्षण संस्थांमध्ये हिजाब बंदी घालण्याच्या सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाचा दाखला दिला होता. मुस्लिम मुलींनी अभ्यास करणे गरजेचे असून हिजाब घालून अभ्यासाला जायचे असेल तर हरकत नाही, असे न्यायाधीशांनी म्हटले होते. एआयएमआयएम प्रमुख म्हणाले की, हा एक अतिशय सकारात्मक निर्णय आहे.

हेही वाचा: Pune News : फक्त पक्ष बदलला, नातं नाही; रुपाली ठोंबरे - वसंत मोरेंची भाऊबीज

एआयएमआयएम प्रमुख ओवेसी म्हणाले होते की, भाजपला हलाल मांस, मुस्लिम टोप्या आणि दाढीमुळे धोका वाटतो. त्यांना आमच्या खाण्याच्या पद्धतीवर आक्षेप आहे. भाजप पक्ष मुस्लीम अस्मितेच्या विरोधात आहे, असेही ते म्हणाले. पंतप्रधानांचे ''सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास'' हे विधान पोकळ असल्याचे त्यांनी म्हटले होते.

टॅग्स :Asaduddin OwaisiMIMaimim