पूरग्रस्तांसाठी ओवैसी सरसावले; 10 लाखांची मदत जाहीर

वृत्तसंस्था
Wednesday, 14 August 2019

केरळ आणि महाराष्ट्रातील पूरग्रस्तांवर दया करा, अशी प्रार्थना त्यांनी अल्लाकडे केली. पूरग्रस्तांना वेळेवर मदत मिळू न शकल्यामुळे तेथे खूप नुकसान झाले आहे. मात्र, आम्ही या कठीण काळात त्यांच्या सोबत आहोत, असेही ओवैसी म्हणाले.

महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर या पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी आता देशभरातून मदतनिधी येत आहे. यामध्ये समाजातील सर्व स्तरातील लोक आपापल्या परीने ही मदत करत आहेत. 'एमआयएम'चे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनीदेखील महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. ही रक्कम मुख्यमंत्री मदतनिधीत जमा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

केरळ आणि महाराष्ट्रातील पूरग्रस्तांवर दया करा, अशी प्रार्थना त्यांनी अल्लाकडे केली. पूरग्रस्तांना वेळेवर मदत मिळू न शकल्यामुळे तेथे खूप नुकसान झाले आहे. मात्र, आम्ही या कठीण काळात त्यांच्या सोबत आहोत, असेही ओवैसी म्हणाले.

महाराष्ट्र आणि केरळ या दोन्ही राज्यांत पावसाने थैमान घातले असून या राज्यांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यांना या आपत्तीतून सावरण्यासाठी आणि तेथील जनता यांचा संसार पुन्हा उभारण्यासाठी हा मदतनिधी ओवैसी यांनी दिला आहे.  

केरळमध्ये आतापर्यंत 91 जणांचा मृत्यू झाला असून 59 जण बेपत्ता आहेत. तर महाराष्ट्रातील 43 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Asduddin Owaisi announced 10 lakhs of aid to Maharashtra and Kerala