
Aseel Hen: बाबो! या कोंबडीला लय डिमांड, शंभंर रूपयाला मिळतंय अंड
कोंबडींच अंड सहा रूपयाला मिळतं. तर चिकन फार तर फार २०० रूपये पर्यंत मिळतं. पण, एक कोंबडी अशी आहे जिचं मांस आणि अंड इतकं महाग आहे की सामान्य लोकांच्या खिशाला ते परवडेबल नाही. त्यामूळे ही कोंबडी चर्चेत आली आहे.
आपल्या देशात असिल जातीची कोंबडी सध्या चर्चेत आहे. या कोंबडीचे मांस आणि अंडी यातून मिळणारा फायदा लक्षात घेता त्यांना पाळणाऱ्यांची संख्या अधिक झाली आहे. या कोंबड्या अंडी उत्पादनाच्या दृष्टीने कमकुवत मानल्या जातात. कारण, त्या वर्षाला केवळ ६० ते ७० अंडी घालतात. त्याच्या अंड्यांची किंमत बरीच जास्त आहे. असिल कोंबडीचे एक अंडे १०० रुपयांना विकत घेतले जाते.या कोंबड्यांचे अंडे डोळ्यांसाठी फायदेशीर असल्याचे सांगितले जाते.
साध्या कोंबडीचे एक अंडे सहा रूपयाला मिळते. तर चिकन १६० रूपये किलो मिळते. प्रोटीन आणि फायबरचा प्रमाण जास्त असल्याने कोंबडी आणि अंड्यांना जास्त डिमांड आहे. पण, असील कोंबडीचे एक अंडे १०० रुपयांना विकले जाते.
असिल कोंबडीची मान लांब व बेलनाकार असून त्याला पंख, दाट डोळे, लांब मान असते. त्यांचे पाय मजबूत आणि सरळ असतात. या जातीच्या कोंबडीचे वजन ४-५ किलो तर कोंबड्याचे वजन ३-४ किलो असते. त्याच्यातील तरुण कोंबडीचे सरासरी वजन ३.५-४.५ किलो आणि कोवळ्या कोंबडीचे सरासरी वजन २.५-३.५ किलो असते.
'या' राज्यात आढळतात असिल कोंबड्या
असिल कोंबडीची जात दक्षिण पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि आंध्र प्रदेशात आढळते. त्याच्या सर्व जातींमध्ये रेझा (हलका लाल), टिकर (तपकिरी), चित्ता (काळा आणि पांढरा चांदी), कागर (काळा), नूरी ८९ (पांढरा), यार्किन (काळा आणि लाल) आणि पिवळा (सोनेरी लाल) जाती खूप प्रसिद्ध आहेत.