Ashok Chavan : आदर्श गैरव्यवहाराचा राज्यसभेत उल्लेख;खासदार चव्हाणांच्या भाषणानंतर काँग्रेस नेत्याचा उलटवार

भाजपचे नेते व खासदार अशोक चव्हाण यांच्याशी संबंधित मुंबईतील आदर्श गैरव्यवहाराचा उल्लेख आज पुन्हा राज्यसभेत झाला.
Ashok Chavan
Ashok Chavansakal

भाजपचे नेते व खासदार अशोक चव्हाण यांच्याशी संबंधित मुंबईतील आदर्श गैरव्यवहाराचा उल्लेख आज पुन्हा राज्यसभेत झाला. खासदार अशोक चव्हाण यांचे भाषण संपल्यानंतर काँग्रेसचे खासदार प्रमोद तिवारी यांनी अशोक चव्हाण यांचा ‘भाजपचे आदर्श नेते’ असा उल्लेख करीत ते भाजपच्या ‘वॉशिंग मशीन’मधून बाहेर पडल्याची टिप्पणी केली.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या संसदेतील अभिभाषणावर मांडण्यात आलेल्या धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेत भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी भाग घेतला. यावेळी त्यांनी मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांमध्ये केलेल्या कामाचा आढावा घेतला. मात्र यावेळी ‘आप’चे खासदार संजय सिंह यांनी अशोक चव्हाण यांच्या नांदेडमध्ये भाजपचा पराभव झाला आहे, असे सांगितले.

यावर उत्तर देताना खासदार चव्हाण यांनी २०१४ मध्ये महाराष्ट्रात काँग्रेसचे केवळ दोन खासदार निवडून आले होते. त्यात नांदेडच्या जागेचा समावेश होता, असा उल्लेख केला. या विजयात माझा काहीसा वाटा होता, असेही त्यांनी सांगितले. अशोक चव्हाण यांच्या भाषणानंतर काँग्रेसचे उपनेते प्रमोद तिवारी यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी आदर्श गैरव्यवहारात सामील असलेले अशोक चव्हाण भाजपच्या वॉशिंग मशीनमधून स्वच्छपणे बाहेर पडले, असा उल्लेख केला. चव्हाण आता भाजपसाठी आदर्श नेते आहेत, असा टोमणाही त्यांनी मारला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com