

Marble Waste Crisis in Rajasthan: Study Warns of Serious Health and Environmental Risks
sakal
नवी दिल्ली: राजस्थानमधील किशनगड येथील आशियातील सर्वांत मोठे संगमरवरी कचरा डंपिंग यार्ड हे प्रदूषणाचे केंद्र बनले आहे. एका नवीन संशोधनानुसार, येथील पीएम २.५ कणांची पातळी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मर्यादेपेक्षा ४ ते १२ पट आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारशींपेक्षा २० ते ५० पट जास्त असल्याचे समोर आले आहे. पर्यटकांचे आकर्षण असलेले हे पर्यटनस्थळ प्रदूषणाचे केंद्र बनले आहे.