आसाममध्ये ब्रह्मपुत्रेने धोक्याची पातळी ओलांडली

पीटीआय
मंगळवार, 30 जून 2020

दिब्रुगडच्या बिरदोई गावात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. आसाममध्ये परामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून,  पूरग्रस्त नागरिकांपर्यंत पोचणे प्रशासनाला कठीण जात आहे.  

गुवाहाटी - मुसळधार पावसामुळे आसाममध्ये महापूर आला असून, ब्रह्मपुत्रा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. आत्तापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला असून, सुमारे ९ लाख जणांना महापुराचा फटका बसला आहे. महापुरामुळे आसामची स्थिती बिघडली असून, असंख्य गावांचा संपर्क तुटला आहे. 

आसाम राज्य आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महापुरामुळे धेमाजी, लखीमपूर, विश्‍वनाथ, उदलगिरी, दरॉंग, नालबारी, बारपेटा, बोंगाईगाव, कोक्राझार, धुब्री, दक्षिण सालमारा, गोलपारा आणि कामरूपसह २३ जिल्ह्यांतील ९ लाख २६ हजार ०५९ जणांना फटका बसला आहे. आसाममध्ये आत्तापर्यंत मृतांची संख्या १६ वर पोचली आहे. यादरम्यान गृहमंत्री अमित शहा यांनी आसामला सर्वोपतरी मदत करण्याचे आश्‍वासन दिले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

अनेक गावे पाण्याखाली
महापुरामुळे अनेक गावांत पाणी शिरले असून, त्यांचा अन्य गावांशी संपर्क तुटला आहे. दिब्रुगडच्या बिरदोई गावात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. आसाममध्ये परामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, पूरग्रस्त नागरिकांपर्यंत पोचणे प्रशासनाला कठीण जात आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

१४२ मदत शिबिरांची स्थापना
येथे मुसळधार पावसामुळे राज्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. सहा जिल्ह्यांत १४२ मदत शिबिरे आणि वितरण केंद्रे स्थापन केली आहेत. यात १९ हजारांहून अधिक नागरिक राहत आहेत.

पर्वतीय भागातील पावसामुळे धोका वाढला
केंद्रीय जल आयोगाचे अधिकारी सादिकुल हक यांच्या मते, पर्वतीय भागात मुसळधार पाऊस पडत असल्याने गुवाहाटीत ब्रह्मपुत्र नदीच्या पाण्याची पातळी वाढतच चालली आहे. सध्या धोक्याची पातळी ओलांडली असून, पाणी धोक्याच्या पातळीपेक्षा २० सेंटीमीटर अधिक पातळीवरून वाहत आहे. हे पाणी प्रतितास एक ते दोन सेंटीमीटरने वाढत चालले आहे. स्थिती चिंताजनक होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Assam, the Brahmaputra crossed the danger level