Crime News : आसाममधील दिमा हसाओ जिल्ह्यातील कोळसा खाणीत अडकलेले नऊ कामगारांच्या सुटकेसाठी चालू असलेल्या बचाव मोहिमेच्या तिसऱ्या दिवशी एका कामगाराचा मृतदेह सापडला. उर्वरित आठ कामगारांच्या सुटकेची आशा कमी झाली आहे.
गुवाहाटी : आसाममधील दिमा हसाओ जिल्ह्यात कोळसा खाणीत अडकलेल्या नऊ कामगारांच्या सुटकेसाठी बुधवारी, तिसऱ्या दिवशीही प्रयत्न सुरू होते. या कामगारांपैकी एकाचा मृतदेह सापडला. त्यामुळे, उर्वरित आठ कामगारांच्या सुटकेची आशाही आता अंधूक झाली आहे.