
गुवाहाटी : येथे होणाऱ्या माघ बिहू उत्सवात म्हशी आणि बुलबुलच्या झुंजींना परवानगी देण्याचा आसाम सरकारचा निर्णय गुवाहाटी उच्च न्यायालयाने रद्द केला. या संदर्भात आसाम सरकारची गेल्या वर्षीची मानक कार्यप्रणाली (एसओपी) न्यायालयाने रद्द केली आहे. म्हशींच्या झुंजींना ‘मोह-जुज’ या पारंपरिक नावाने ओळखले जाते. न्यायालयाने हेही नमूद केले, की या पारंपरिक विधींना जर मुभा द्यायचीच असेल तर प्रस्थापित कायद्यांत राज्य सरकारने बदल करावा.