
गुवाहाटी : आसाममध्ये गेल्या २४ तासांत सततच्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. सहा जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीचा फटका दहा हजार १५० हून अधिक नागरिकांना बसल्याची माहिती आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एएसडीएमए) दिली आहे.